ETV Bharat / city

No mask action in Mumbai : विनामास्क ४१ लाख मुंबईकरांकडून ८३ कोटींचा दंड वसूल

author img

By

Published : Dec 27, 2021, 11:19 AM IST

मुंबई कारवाई
Mumbai action

सध्या मुंबई शहरात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण ( Mumbai Omicron variant Patients ) झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. त्यामुळे विनामास्क वावरणाऱ्या लोकावंर कारवाई करुन मोठा दंड वसूल केला आहे. यामध्ये आतापर्यंत ४१ लाख लोकांवर कारवाई ( Action against 41 lakh people in mumbai ) करताना प्रशासनाने सुमारे ८२ कोटी दंड वसूल केला आहे.

मुंबई : मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार सुरु आहे. त्यातच आता ओमायक्रॉन या व्हेरियंटचे रुग्ण ( Patients of Omicron variant in Mumbai )आढळून येत आहेत. या विषाणूंचा हा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरही जे नागरिक मास्क घालत नाहीत, अशा नागरिकांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विनामास्क नागरिकांवर, रेल्वे प्रवाशांवर पालिका, क्लिनअप मार्शल तसेच पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. १७ एप्रिल २०२० ते २४ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल ४१ लाख ५६ हजार २९६ विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये ८२ कोटी ६४ लाख ५० हजार ७७१ रुपये दंड वसूल ( 82 crore 64 lakh 50 thousand 771 fine recovered ) केला आहे.

४१ लाख नागरिकांवर कारवाई -

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर विषाणूचा झपाट्याने प्रसार झाल्याने एप्रिल महिन्यापासून नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली. मास्क सक्ती केल्यानंतर ही बऱ्याच बेशिस्त नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे आता अशा बेशिस्त नागरिकांवर मोठी कारवाई केली आहे. २० एप्रिल २०२० पासून आतापर्यंत ४१ लाख ५६ हजार २९६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ज्यामधून ८२ कोटी ६४ लाख ५० हजार ७७१ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने ३३ लाख ६८ हजार ५०९ नागरिकांवर कारवाई ( Municipal Corporation takes action against 33 lakh 68 thousand 509 citizens ) करत ६६ कोटी ८६ लाख ३२ हजार ३७१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई पोलिसांनी ७ लाख ६३ हजार ८९६ नागरिकांवर कारवाई करत १५ कोटी २७ लाख ७९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर रेल्वेने २३ हजार ८९१ नागरिकांवर कारवाई करून ५० लाख ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोनाचा त्रिसूत्रीचे पालन करा -

कोरोना किंवा इतर कोणत्याही विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक दोन लसी घेणे अनिवार्य आहे. तसेच नागरिकांनी लस घेतली असली किंवा त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्या असल्या तरी त्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. अशा नागरिकांना सौम्य लक्षणे होऊ जाणवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे, या त्रिसूत्री नियमांचे आपल्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी पालन करावे, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Municipal Corporation Additional Commissioner Suresh Kakani ) यांनी केले आहे.


पालिकेची कारवाई -
अशी केली दंडात्मक कारवाई (कोटीत)
परिमंडळ - १
विना मास्क फिरणारे - ५,५७,७०५ -
दंड वसूल - ११,२६,४७,९००

परिमंडळ - २
विना मास्क फिरणारे - ५,५२,०२१
- दंड वसूल - ११,७१,१२,१००

परिमंडळ - ३
विना मास्क फिरणारे - ४,४०,२५८
- दंड वसूल - ८,५७,७,४००

परिमंडळ - ४
विना मास्क फिरणारे - ६,१६,४५०
- दंड वसूल - १२,३९,३५,४००

परिमंडळ - ५
विना मास्क फिरणारे - ४,५२,५७५
- दंड वसूल - ९,११,६९,५००

परिमंडळ - ६
विना मास्क फिरणारे - ३,७८,३५२
- दंड वसूल - ७,५८,३६, ८७१

परिमंडळ - ७
विना मास्क फिरणारे - ३,५८,१४८
- दंड वसूल - ७,१६,७४,२००

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.