ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 558 नवे रुग्ण, 4 रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Feb 10, 2021, 8:49 PM IST

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

मुंबईत आज 558 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 13 हजार 206 वर पोहचला आहे.

मुंबई - मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. आज (बुधवारी) मुंबईत कोरोनाचे 558 नवे रुग्ण आढळून आले. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

कोरोना रुग्णांची आकडेवारी -

मुंबईत आज 558 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 13 हजार 206 वर पोहचला आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 400 वर पोहचला आहे. 476 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 95 हजार 521 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 5369 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 555 दिवस -

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 555 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 147 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 856 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 29 लाख 49 हजार 675 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा- 'कायद्याच्या चौकटीत राहूनच राज्यपालांवर टीका करावी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.