ETV Bharat / city

Omicron Maharashtra Updates : राज्यात गुरुवारी ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही, तर 877 नवे कोरोनाबाधित

author img

By

Published : Dec 16, 2021, 8:13 PM IST

Updated : Dec 17, 2021, 12:20 PM IST

आज ( गुरुवारी ) दिवसभरात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे राज्याला दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनाच्या रुगसंख्येत वाढ ( Increase corona Patient ) झाली असून 877 नवीन रुग्ण सापडले आहेत. पैकी 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने ( Health Department ) दिली आहे.

ओमायक्रॉन
ओमायक्रॉन

मुंबई - राज्यात ओमायक्रॉन विषाणूच्या ( Omicron Variant ) तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. वेगाने पसरणाऱ्या विषाणूचा आज ( गुरुवारी ) दिवसभरात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे राज्याला दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनाच्या रुगसंख्येत वाढ ( Increase corona Patient ) झाली असून 877 नवीन रुग्ण सापडले आहेत. पैकी 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने ( Health Department ) दिली आहे.

  • 6693 ऍक्टिव्ह रुग्ण

राज्यात आज दिवसभरात 877 नवीन रुग्ण सापडले. कोरोनाग्रस्तांचा आकडा यामुळे 66 लाख 46 हजार 973 वर पोहोचला आहे. तर आज 632 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले. आतापर्यंत 64 लाख 95 हजार 949 कोरोना बाधित उपचारानंतर बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर स्थित स्थावर म्हणजेच 97.72 टक्के इतका आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आज दिवसभरात 19 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. तर कोरोना बाधित रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 73 लाख 06 हजार 860 चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांपैकी 09.91 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 73 हजार 371 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहे. तर आतापर्यंत 6 हजार 693 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


'या' विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई महापालिका - 272
ठाणे - 10
ठाणे मनपा - 44
नवी मुंबई पालिका -
कल्याण डोंबिवली पालिका - 34
वसई विरार पालिका - 8
नाशिक - 30
नाशिक पालिका - 30
अहमदनगर - 50
अहमदनगर पालिका - 14
पुणे - 63
पुणे पालिका - 125
पिंपरी चिंचवड पालिका - 33


आतापर्यंत ओमायक्रॉनचे 34 रुग्ण

राज्यात आजपर्यंत 34 रुग्ण सापडले असून आज दिवसभरात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मुंबईतील 13, पिंपरी चिंचवड 10, पुणे मनपा आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी 2, कल्याण डोंबिवली, नागपूर, लातूर, वसई - विरार, बुलढाणा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. पैकी 25 जणांची आरटीपीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडून देण्यात आले आहे.

आजपर्यंत 430 प्रवाशांची जनुकीय चाचणीसाठी नमुने

1 डिसेंबरपासून आजपर्यंत 105889 प्रवासी मुंबई, नागपूर आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. एकूण 17 हजार 940 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 35 आणि इतर देशातील 12 अशा एकूण 47 तर आजपर्यंतच्या 465 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 26 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

हेही वाचा - Omicron In Maharashtra : राज्यात आज ओमायक्रॉनचे ४ नवे रुग्ण; रुग्णांचा आकडा ३२ वर, २५ रुग्णांना डिस्चार्ज

Last Updated :Dec 17, 2021, 12:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.