ETV Bharat / city

ST Workers Strike : संप सोडून १८ हजार कर्मचारी कर्तव्यावर हजर, १५१ आगार बंदच

author img

By

Published : Dec 6, 2021, 11:32 PM IST

विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप ( ST Workers Strike ) सुरू आहे. वारंवार कामावर परतण्याचे आवाहन करुनही कर्मचारी कामावर परतत नसल्याने राज्य परिवहन महामंडळाने ( MSRTC ) कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे आज १८ हजार ८८८ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले ( Employees Return To Work ) आहेत. मात्र, अद्याप ७३ हजार ३७८ कर्मचारी अजूनही प्रत्यक्षात संपात सहभागी असल्याने ( ST Workers Strike ) अद्याप १५१ आगार बंद आहेत ( ST Bus Depot Close ), अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

लालपरी
लालपरी

मुंबई - विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप ( ST Workers Strike ) सुरू आहे. कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने ( MSRTC ) अखेर संपकऱ्यांवर जोरदार कारवाई सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईच्या धास्तीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कर्तव्यावर हजर होत आहे. आज (दि. 6) राज्यभरात संप सोडून १८ हजार ८८८ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत.

७३ हजार ३७८ कर्मचारी संपामध्येच -

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी सुरू असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. तब्बल ३३ दिवस होऊनही एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाईला सुरुवात केली आहे. महामंडळाने कर्तव्यावर रुजू न हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली. महामंडळाने आतपर्यत राेजंदारीवरील १ हजार ९९० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून ९ हजार ६२५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मात्र, निलंबनाच्या कारवाई नंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे महामंडळाने कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय कर्मचाऱ्यांचा बदल्या करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे आता संपात सहभागी होणाऱ्या कर्मचारी संप सोडून कर्तव्यावर हजर होत आहे. आज राज्यभरात १८ हजार ८८८ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. तरीही ७३ हजार ३७८ कर्मचारी अजूनही प्रत्यक्षात संपात सहभागी ( ST Workers Strike ) असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

आज एसटी कर्मचारी उपस्थिती

प्रशासकीय कर्मचारी - ९ हजार ४२६ पैकी आज ९ हजार ४०२कर्मचारी हजर

कार्यशाळा कर्मचारी - १७ हजार ५६० पैकी आज ५ हजार ८१० कर्मचारी हजर

एसटी चालक - ३७ हजार २२५ पैकी आज १ हजार ८८६ कर्मचारी हजर

एसटी वाहक - २८ हजार ५५ पैकी आज १ हजार ७९० कर्मचारी हजर

१५१ आगार संपामुळे बंदच

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारपर्यंत राज्यभरातील २५० आगारांपैकी ९९ आगार सुरू झाले. १५१ आगार संपामुळे अजूनही बंद ( ST Bus Depot Close ) आहे. राज्यातील औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक आणि अमरावती विभागातून १ हजार ६९९ बसेस धावल्या आहेत. ज्यामध्ये शिवनेरी, शिवशाही आणि साध्या बसेसचा सामावेश आहे. विशेष म्हणजे सुटलेल्या बसेसपैकी सर्वाधिक बसेस लांब पल्ल्याचा बसेस होत्या. ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा आहे.

हे ही वाचा - OBC Reservation : सरकारकडे कायद्याचा गोंधळ, ओबीसींची हेटाळणी आणि छळ - गुणरत्न सदावर्ते

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.