ETV Bharat / city

अंबाबाईच्या मुखदर्शनासाठी मंदिराचा पश्चिम दरवाजा उघडला

author img

By

Published : Jan 1, 2021, 3:49 PM IST

Updated : Jan 1, 2021, 3:57 PM IST

west side door of the  Ambabai temple
अंबाबाई मंदिराचा पश्चिम दरवाजा उघडला

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना भेट दिली आहे. पूर्व दरवाजानंतर आता पश्चिमेचे महाद्वार सुद्धा उघडण्यात आले असून हा दरवाजा मुख दर्शनासाठी उघडण्यात आला आहे. मंदिरही पहाटे 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले राहणार आहे.

कोल्हापूर - नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना भेट दिली आहे. पूर्व दरवाजानंतर आता पश्चिमेचे महाद्वार सुद्धा उघडण्यात आले असून हा दरवाजा मुख दर्शनासाठी उघडण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना केवळ मुखदर्शन घ्यायचे असेल तर त्या सर्व भाविकांना महाद्वार दरवाजामधून आत येऊन गणेश मंडपातून दर्शन घेता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा दरवाजा उघडण्यात आला. आता मंदिरही पहाटे 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले राहणार आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा पश्चिम दरवाजा उघडला
मंदिर परिसरातील दुकानेही मार्चपासून बंदच - लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यापासून आजपर्यंत अंबाबाई मंदिर परिसरातील सर्वच दुकाने बंद होती. मंदिराच्या बाहेरच्या बाजूची सर्वच दुकाने सद्या सुरू आहेत. खरंतर मंदिरात येण्यासाठी एकूण 4 दरवाजे आहेत. त्यातील पूर्व दरवाजातून आत मध्ये येऊन दक्षिण दरवाजातून बाहेर जाण्याची सोया करण्यात आली आहे. उरलेल्या दोन दरवाजांपैकी पश्चिम दरवाजा सुद्धा उघण्यात आला आहे. मात्र मणिकर्णिका कुंडाचे काम सुरू असल्याने उत्तर दरवाजा म्हणजेच घाटी दरवाजा अद्याप बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान घाटी दरवाजा उघडण्याबाबत इथले दुकानदार देवस्थान समितीकडे विनंती करत आहेत. मात्र आजपासून महाद्वार उघडण्यात आले असून हळू-हळू सर्व नियम शिथील होतील असेही देवस्थान समितीकडून सांगण्यात आले आहे. भाविकांनी सर्वच नियमांचे पालन करावे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही 65 वर्षांवरील भक्तांना तसेच लहान मुलांना मंदिरामध्ये प्रवेश देण्यात आला नाहीये. शिवाय अजूनही प्रत्येक भाविकांची तपासणी केल्यानंतरच सर्वांना मंदिरात प्रवेश आहे. आजपासून मुखदर्शन घेण्यासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांनी शासनाच्या सर्वच नियमांचे पालन करावे, असे आवाहन सुद्धा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे. भक्तांच्या लांबच-लांब रांगा - नववर्षाच्या स्वागताला सर्वजण दरवर्षी मोठ्या संख्येने अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात येत असतात. आज पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र आहे.
Last Updated :Jan 1, 2021, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.