ETV Bharat / city

Govind Pansare murder case : कॉ. पानसरे हत्याप्रकरणी सर्व संशयित आरोपींना प्रत्यक्ष हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश

author img

By

Published : Jul 27, 2022, 7:04 PM IST

Govind Pansare murder case
गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कॉ.गोविंद पानसरे हत्याप्रकरणी ( Govind Pansare murder case ) कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात ( Kolhapur District Sessions Court ) सुनावणी पार पडली. पानसरे हत्याप्रकरणी संशयित आरोपी वीरेंद्र तावडे, ( Virendra Tawde ) सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

कोल्हापूर - कॉ.गोविंद पानसरे हत्याप्रकरणी ( Govind Pansare murder case ) संशयित आरोपी वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात ( Kolhapur District Sessions Court ) हजर करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात तिघांसंदर्भात सुनावणी पार पडली. तर, सध्या जामिनावर असणारा समीर गायकवाड ही ( Sameer Gaikwad ) न्यायालयात हजर होता. यावेळी युक्तीवादानंतर सर्व आरोपीना प्रत्यक्ष न्यायालयात हजर केल्यावर पुढील सुनावणी 5 ऑगस्टला होणार असल्याचे न्यायमूर्तीनी सांगितले आहे.

गोविंद पानसरे हत्या प्रकरण

प्रत्यक्ष चार्ज फ्रेम करणार - या प्रकरणातील सर्व आरोपी हजर असल्याशिवाय चार्ज फ्रेम करू नका असे आरोपींचे वकिल ऍड समीर पटवर्धन यांनी न्यायालयात मागणी केली आहे. यामुळे आरोपींच्या वकिलांची ही मागणी न्यायालयाने मान्य करून 5 ऑगस्टला सर्व संशयित आरोपींना न्यायालयात हजर करून प्रत्यक्ष चार्ज फ्रेम करणार असल्याची माहिती सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा - I was raped says victim after 12 yrs:'माझ्यावर बलात्कार झाला', 12 वर्षांनंतर पीडित मुलगीने केला गौप्यस्फोट

पानसरे यांच्या हत्येला 7 वर्ष उलटले - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 7 वर्ष उलटून गेलेत. मात्र, त्यांची हत्या कुणी केली याचा तपास आणखी लागलेला नाही. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 7 वर्ष उलटून गेले आहेत. मात्र, या तपासात कोणतेच धागे दोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या कालावधीत अनेक पोलीस अधिकारी कोल्हापुरात येऊन गेले. प्रत्येक वेळी तपासात हे ना ते कारण देत कॉम्रेड पानसरे यांना न्याय देण्यापासून वंचित ठेवले आहे. आता सध्या या केसमध्ये अनेक संशयितांना अटक करण्यात आलेले आहे.

यापूर्वी एकूण 9 संशयित आरोपींवर आरोप निश्चितीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यापैकी आज 3 संशयित आरोपींना न्यालयात प्रत्यक्ष हजर करण्यात आले असून यामध्ये संशयित आरोपी वीरेंद्र तावडे,सचिन अंदुरे,शरद कळसकर यांचा समावेश आहे. या तिघांवर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी जामिनावर असलेला संशयित आरोपी समीर गायकवाड हा देखील कोर्टामध्ये उपस्थित होता. यावेळी आरोपींचे वकील एडवोकेट समीर पटवर्धन यांनी सर्व आरोपी एकत्र हजर असल्याशिवाय आरोपींवर चार्जशिट दाखल होऊ नये अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली. तर कोर्टाने ही विनंती मान्य करून सर्व आरोपींना 5 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, १६ फेब्रुवारी 2015 ला पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर दुचाकीवर आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. कोल्हापुरातील त्यांच्या घराजवळच ही घटना घडली होती. घटनेच्या चार दिवसानंतर गोविंद पानसरेंचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा सदस्य डॉ. विरेंद्र तावडे याला 2 सप्टेंबर 2016 रोजी अटक करण्यात आली होती.

त्यानंतर याप्रकरणी आणखी एक आरोपी समीर गायकवाड याला 16 सप्टेंबर 2016 रोजी अटक करण्यात आली होती. डॉ. विरेंद्र तावडे व समीर गायकवाडच्या चौकशीतून सारंग अकोळकर, विनय पवार यांच्यासह अन्य चार संशयिताची नावे निष्पन्न झाली होती. त्यानुसार एसआयटीने अमोल काळेला १५ नोव्हेंबर २०१८, वासुदेव सुर्यवंशीला १ डिसेंबर २०१८, भरत कुरणेला १ डिसेंबर २०१८ आणि अमित देगवेकरला १५ जानेवारी २०१९ मध्ये अटक केली होती. कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येसाठी मास्टरमाईंड डॉ. वीरेंद्र तावडे यांनी अमोल काळेसह चारही मारेकऱ्यांवर वेगवेगळी कामगिरी सोपवली होती. बाँबस्फोट घडविण्यासह बंदूक चालविण्याच्या प्रशिक्षणाचीही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. तर देगवेकरवर कॉम्रेड पानसरे यांचे निवासस्थान, बिंदूचौकातील कार्यालयाच्या रेकीची जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा - Pune youth Suicide : महिलेच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.