ETV Bharat / city

जागतिक टपाल दिन : नाविन्यपूर्ण टपाल तिकीट संग्रहाचा बादशहा 'रविंद्र ओबेरॉय'

author img

By

Published : Oct 9, 2021, 9:11 AM IST

Updated : Oct 9, 2021, 10:22 AM IST

जागतिक टपाल दिन
जागतिक टपाल दिन

एखादा छंद जोपासताना व्यक्ती आपले तन, मन, धन विसरून जातो. असाच एक अवलिया आपल्याला कोल्हापूरात पाहायला मिळतो. ज्याच्याकडे ब्रिटिश कालखंडापासून ते आजपर्यंतच्या सर्व टपाल तिकिटांचा संग्रह आहे.

कोल्हापूर - 'हौसेला कधीच मोल नसते' असे म्हणतात. एखादा छंद जोपासताना व्यक्ती आपले तन, मन, धन विसरून जातो. असाच एक अवलिया आपल्याला कोल्हापूरात पाहायला मिळतो. ज्याच्याकडे ब्रिटिश कालखंडापासून ते आजपर्यंतच्या सर्व टपाल तिकिटांचा संग्रह आहे. तर जर्मनी, इंग्लड, स्वीझरलँडसह १२२ देशांचे टपाल तिकीट आपल्या म्युझियम जपून ठेवले आहेत. इतकेच काय तर यात वाईल्ड लाईफ, महात्मा गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा, यासारखे स्पेशेलायझेशन निर्माण करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रवींद्र गुरूदयाळ ओबेराय, असे या तिकीट संग्रहकाचे नाव आहे.

रवींद्र गुरुदयाळ ओबेरॉय हे 78 वर्षीय संग्रहक कोल्हापूरातील ताराबाई पार्क येथे राहतात. त्याच्याकडे ११२ देशांच्या टपाल तिकीट आणि कव्हर पेज यांचा संग्रह आहे. भारतातील ब्रिटिश कालखंडापासून ते आजपर्यंत टपाल तिकीट, कव्हर पेज असे सात ते आठ हजार टपाल तिकिटांचा संग्रह आहे. देश स्वतंत्र झाला तेंव्हा रवींद्र ओबेरॉय हे 7 वर्षाचे होते. लहानपणापासूनच त्यांना टपाल तिकीट संग्रह करण्याचा छंद लागला. तो आजही कायम आहे. आजही तिकीट संग्रह करण्याची भूक रविंद्र ओबेरॉय यांना कायम आहे. तर ओबेरॉय हे काहीकाळ डब्लू डब्लू या नेचर क्लबचे सदस्य राहिल्याने त्यांना प्राणीविषयक तिकिटांचा संग्रह करणे शक्य झाले.

प्रतिक्रिया

वडिलांच्या कानपिचक्या अन टपाल तिकीट संग्रहाचा छंद -

ओबेरॉय कुटुंब हे मूळचे कोल्हापूरचे. लहानपणापासून रविंद्र ओबेरॉय यांना मित्रांसोबत फिरण्याची आवड होती. त्यांच्या मित्रांना सिगारेटची पाकीट गोळा करण्याचा छंद होता. त्यांनाही याची आवड निर्माण झाली होती. मात्र, सिगारेटची पाकीट गोळा करत असताना बिंदू चौक येथे वडील गुरूदयाळ यांना हे सर्वजण सापडले. त्यावेळी रविंद्र याना ओरडून हा नाद करू नका? त्यापेक्षा टपाल तिकीट किंवा जुनी नाणी गोळा करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून रविंद्र ओबेरॉय यांना टपाल तिकीट संग्रह करण्याचा छंद लागला. पूर्वी पासून ओबेरॉय यांची फोटोग्राफी ऐजेन्सी असल्याने त्यांना जर्मनी, इंग्लंड करून टपाल यायचे. त्यामुळे त्यांना ही सवय लागत गेली.

संग्रह एक कला पण त्यात काहीतरी वेगळे असण्याची इच्छा -

देशभरात अनेक व्यक्तींकडे टपाल तिकिटांचा संग्रह आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत अनेकांकडे भरमसाठ तिकीटांचा संग्रह आहे. मात्र आपल्याकडे तिकीट संग्रह असताना त्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण असावे, असे रवींद्र ओबेराय यांना वाटत. त्यामुळे प्रत्येक विषयाचे स्पेशलायझेशन ठेवत त्यांनी तिकिटांचा संग्रह तयार केला आहे. क्रीडाविश्वातील टपाल तिकिटांचा संग्रह, वाइल्डलाइफ विषयातील टपाल तिकिटांचा संग्रह, दुर्मिळ प्राणी यांच्या विषयावरील टपाल तिकीट संग्रह, स्वातंत्र्य काळापासून महात्मा गांधी यांच्या पहिल्या तिकीटापासून ते आजपर्यंतच्या तिकीटांपर्यंत संग्रह त्यांनी केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून विविध देशाला दिलेल्या भेटी आणि त्यांनी केलेले टपाल तिकिट आणि कव्हर पेज याचे सर्व संग्रह ओबेराय यांनी केला आहे.

दोन वेळा ग्लोड, सिल्व्हर आणि तीनवेळा ब्रॉंझ -

रवींद्र ओबेराय यांनी टपाल तिकिटांच्या स्पेशलायझेशनवर विविध विषयांवर जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय प्रदर्शन मध्ये भाग घेतला. या स्पर्धेत त्यांनी दोन वेळा गोल्ड मेडल, दोन वेळा सिल्वर मेडल, तीन वेळा ब्रँच मेडल पटकावले आहे.

कोल्हापूरसाठी अभिमानाची गोष्ट -

2001 साली शाहू स्मारक भवन येथे टपाल तिकिटांचे संग्रह भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात कोल्हापूरच्या अभिमानाची गोष्ट घडून आली. भारतीय टपाल विभागाने कोल्हापुरातील काही ऐतिहासिक वास्तूंचे टपाल प्रकाशित केले. हे प्रकाशन माझ्या हस्ते झाल्याचं मला अभिमान आहे. यात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर शिवाजी विद्यापीठ आणि नवीन राजवाडा या तिकीटांचा समावेश आहे.

छंदापुढे पैशाचे मोल कधीच केले नाही -

रवींद्र ओबेराय यांना लहानपणापासूनच टपाल तिकीट संग्रह करण्याचा छंद होता. त्यांनी आजवर 112 देशांची तिकीट संग्रही ठेवले आहेत. तर भारतातील ब्रिटिश काळापासून ते आजपर्यंत सर्व तिकिटांचा संग्रह ओबेराय यांच्याकडे आहे. मात्र, हा संग्रह करत असताना अनेक वेळा त्यांनी आपल्या छंदाच्या पुढे पैशाचे मोल कधीच ठेवले नाही. एखाद्या विषयाचा तिकीट संग्रह करत असताना त्यातील एक तिकीट जरी नसले तर त्यांना तो संग्रह अपूर्णं असल्याचे जाणवत होते. त्यामुळे ते एक तिकीट खरेदी करण्यासाठी त्यांना कितीही किंमत मोजावी लागली, तरी ते तयार होते. त्यामुळे छंदा पुढे त्यांनी कधीही पैशाचे मोल ठेवले नाही.

हेही वाचा - मला ईडीची नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेने वेडी ठरवले, पवारांचे टीकास्त्र

Last Updated :Oct 9, 2021, 10:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.