ETV Bharat / city

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले; ९ हजार ४३२ क्युसेकने विसर्ग सुरू

author img

By

Published : Jul 26, 2022, 10:05 AM IST

Updated : Jul 26, 2022, 10:34 AM IST

पैठण जायकवाडी धरणाचा ( Jayakwadi Dam ) पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहचला आहे. धरणात वरच्या भागातून पाण्याची मोठी आवक होत असल्याने जायकवाडी धरण प्रशासनाने सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत धरणाचे 18 वक्र दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून ९ हजार ४३२ क्युसेक ( Flow Speed of 9432 Cusecs ) या वेगाने गोदावरी नदीपात्रात ( Godavari River ) विसर्ग सुरू केला आहे.

Jayakwadi Dam
जायकवाडी धरण पूजा

पैठण (औरंगाबाद) : पैठण जायकवाडी धरणाचा ( Jayakwadi Dam ) पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहचला आहे. धरणात वरच्या भागातून पाण्याची मोठी आवक होत असल्याने जायकवाडी धरण प्रशासनाने सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत धरणाचे 18 वक्र दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून ९ हजार ४३२ क्युसेक या वेगाने ( Flow Speed of 9432 Cusecs ) गोदावरी नदीपात्रात ( Godavari River ) विसर्ग सुरू केला आहे.

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले

जायकवाडी धरण प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : यावेळी अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, तहसीलदार दत्तात्रेय निलावाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, उपअभियंता बंडु चव्हाण, विजय काकडे, गणेश खराडकर, अशोक अंधारे यांची उपस्थिती होती. सध्या जायकवाडी धरणात ३६ हजार क्युसेक वेगाने पाणी दाखल होत आहे.

धरणात 90 टक्के पाणीसाठा : सध्या धरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहचला आहे. सोडण्यात आलेला विसर्ग मोठ्याप्रमाणात असल्याने गोदीवरी नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. गोदावरी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे प्रशासनाने केले आहे. सायंकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते विधीवत पूजन करून वक्री दरवाजाचे ही 18 तारखेला 9432 पिशेने पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले.

जायकवाडी धरणाचे पाणी पूर्ण मराठवाड्याला उपयुक्त : आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे 103 टीएससीचे जायकवाडी धरण आहे. यंदा जायकवाडी धरणात जवळपास 65.70% टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेऔरंगाबादसह जालना, बीड जिल्ह्याचा काही आणी, गोदावरी नदी काठची आणि धरण पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये पाणी टंचाई भासणार नाही. एकदा धरण शंभर टक्के भरले की दोन वर्षे पाणी पुरेल, असे म्हणले जाते. म्हणून यावर्षी मराठवाड्यातील नागरिकांना पाणी टंचाई पासून मुक्ती राहील, असे तज्ञाचे मत आहे.

हेही वाचा : Agnipath candidates On Army : लष्करात एक दिवस काम मिळाले तरी अभिमानाची बाब

Last Updated :Jul 26, 2022, 10:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.