ETV Bharat / city

CBSE Result 2022 : मोबाईलची सवय मोडत आकांक्षा ढगेने मिळवले 96% टक्के गुण

author img

By

Published : Jul 24, 2022, 8:42 PM IST

Updated : Jul 24, 2022, 8:49 PM IST

Akanksha Dhage
आकांक्षा ढगे

विद्यार्थ्यांना लागलेली मोबाईलची सवय डोखेदुखी ( Mobile phone habit ) ठरत आहे. मात्र या सवयी अनेक विद्यार्थी आणि पालकांनी सोप्या पद्धतीने बदलून आपल्या जीवनात यशाचा पाया रोवण्यास सुरुवात केली. शिक्षणात ( Edutation ) यशाचं शिखर गाठायचं असेल तर त्यासाठी योग्य नियोजन करावे लागते. आकांक्षाने ढगेने देखील तिच्या अभ्यासाचे नियोजन केले. सीबीईऐसी परीक्षेत ( CBSE Exam ) 96 टक्के गुण मिळवले असून इंग्रजी विषयात शंभर गुण आकांक्षाने मिळवले आहेत.

औरंगाबाद - कोरोना काळात विद्यार्थ्यांना लागलेली मोबाईलची सवय डोखेदुखी ( Mobile phone habit ) ठरत आहे. मात्र या सवयी अनेक विद्यार्थी आणि पालकांनी सोप्या पद्धतीने बदलून आपल्या जीवनात यशाचा पाया रोवण्यास सुरुवात केली. असच काहीसं केलं नुकतीच दहावी पास झालेल्या आकांक्षा ढगेने सीबीएऐसी परीक्षेत 96 टक्के गुण मिळवले असून इंग्रजी विषयात शंभर गुण आकांक्षाने ( Akanksha Dhage ) मिळवले आहेत.

आकांक्षा ढग मुलाखत

अभ्यासच केलं नियोजन - शिक्षणात यशाचं शिखर गाठायचं ( Edutation ) असेल तर त्यासाठी योग्य नियोजन करावे लागते. आकांक्षाने देखील तिच्या अभ्यासाचे नियोजन केले. शाळेतुन घरी आलं की रोज किमान पाच ते सहा तास अभ्यास तिने सुरू केला. रोज एका विषयाचा अभ्यास करायचा, त्यात असलेल्या समस्या शिक्षकांना किंवा आई - वडिलांना विचारायच्या आणि तो विषय परिपूर्ण होईल याची काळजी आकांक्षाने घेतली. गणित आणि हिंदी हे विषय तिला अवघड जातात. त्यामुळे या विषयाचा जास्त अभ्यास केला. वाचन वाढवलं, प्रश्न पत्रिका संच सोडवण्यावर भर दिला. परिणामी परीक्षेत या दोन विषयांचे प्रश्न सोडवणे थोडं सोपं गेलं अस मत आकांक्षाने व्यक्त केलं.


मोबाईलची सवय मोडली - कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात प्रत्यक्ष शाळेत जाऊन अभ्यास करणे शक्य नव्हते. त्यावेळी ऑनलाइन अभ्यास करावा लागला. मात्र त्याच बरोबर मोबाईलचा अतिवापर देखील त्यामाध्यमातून सुरू झाला होता. दहावीचे वर्ष असल्याने मोबाईलची सवय मोडण्यासाठी आकांक्षाने काही नियम स्वतःसाठी तयार केले. मोबाईलचा वापर कमी करण्याचा तिने ठरवलं आणि रोज एक तास मोबाईलचा वापर करायचा आणि नंतर आई किंवा वडिलांकडे मोबाईल द्यायचा. अस करून मोबाईल पेक्षा अभ्यासाकडे भर आकांक्षाने दिला आणि त्यामुळेच दहावीत चांगले गुण मिळवता आले अस मत आकांक्षा ढगे हिने व्यक्त केले.

हेही वाचा - Beer Bar Permit Virawade : अजबच ! बियरबारच्या परवान्यासाठी स्वागत कमान बांधून देण्याची अट; विरवडे ग्रामपंचायतीचा कारभार

अतिरिक्त वाचन आणि स्पर्धतेत सहभागाने वाढला आत्मविश्वास - आकांक्षाने मिळवलेल्या यशामुळे ढगे कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आकांक्षाने अभ्यास करताना अतिरिक्त शिकवणी लावली नाही. अभ्यासच नियोजन केले. आणि वाचनाची सवय आणि शाळांमध्ये असणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा यांमध्ये असणाऱ्या सहभाग त्यामुळे आत्मविश्वास वाढला. आणि रिसर्च करण्याची सवय लागली. या सवयीमुळे तिला यश मिळवणे सोपे झाले अस मत आकांक्षाने वडील लेफ्टनंट कर्नल डॉ सतीश ढगे यांनी व्यक्त केलं. तर आकलन शक्ती चांगली असल्याचा फायदा तिला झाला असल्याचं मत आई डॉ सुलेखा ढगे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा - Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागत असल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता; अनेकांना मंत्रिपदाचे वेध

Last Updated :Jul 24, 2022, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.