अमरावती - औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील ( umesh kolhe murder case ) मुख्य आरोपी शेख इरफान हा गुन्हेगारी परवृत्तीचा असून शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल आणि राजकीय संबंध असणारा एक मौलवी यांच्या मदतीने अनेक चुकीचे काम हा करत होता. अमरावती पोलिसांना ( Amravati Police ) शहरात शांतता नांदावी, यासाठी या टोळीविरोधात कोंबिंग ऑपरेशन ( Combing operation ) राबवावे अशी मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे ( MP Dr. Anil Bonde ) यांनी यावेळी केली आहे.
शेख इरफानने हिंदू मुलीवर केला अत्याचार - इंदोर शहारत एका हिंदू मुलीचे 11 डिसेंबर 2021 लग्न झाले होते. लग्नानंतर 25 दिवसांनी त्या मुलीला शेख इरफान आणि त्याच्या 4 साथीदारांनी अमरावतीत पळवून आणलं आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. तिला डांबून ठेवलं होत. इंदोर पोलिसांनी अमरावतीत येऊन त्या मुलीसह या 4 जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात शेख इरफान दीड महिना इंदोरमध्ये पोलीस कोठडीत होता. त्याला जामीन मिळाल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी याच्यावर निगराणी ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या असे डॉ. अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.
अट्टल बदमाश असणाऱ्या शेख इरफान याच्यावर अमरावती पोलिसांनी लक्ष न ठेवता त्याला गुन्हेगारी कारवाई करण्यासाठी मोकळं सोडलं. शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस याचा खास साथीदार असून, त्यांच्या विरोधात देखील कारवाई व्हायला हवी. इतर राज्यात लव्ह जिहाद सारखे गौरकृत्य करणारे, तसेच इतर गुन्हे करणारे, अनेक जण अमरावती शहारत लपले आहेत. त्यांचा शोध अमरावती पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी केली आहे.