ETV Bharat / city

शरद पवारांना भेटलोच नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा

author img

By

Published : Jul 6, 2022, 8:54 AM IST

Updated : Jul 6, 2022, 2:34 PM IST

शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत, शिवसेनेच्या काही आमदारांबरोबर एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde on Sharad Pawar ) गट तयार केला. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनेत संतापाची लाट उसळली आहे. मात्र, आता भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे यांनी महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांची भेट घेतल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, या अफवा असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

CM Eknath Shinde on sharad pawar
शरद पवार भेट एकनाथ शिंदे स्पष्टीकरण

मुंबई - राज्यातील सत्ता संघर्षाचा वाद शिगेला पोहचला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde on Sharad Pawar ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याच्या वावड्या उठल्या. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांसोबत कोणताही भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही केले आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.....#MaharashtraFirst

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • या भेटी दरम्यानचा हा फोटो आहे… pic.twitter.com/vMAMIcTjfL

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Eknath Khadse Governor Meet : एकनाथ खडसेंनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आमची कुंचबना होत होती, असा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदार यांनी बंड पुकारला. राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याच्या प्रयत्न सुरू आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा ही दूर जात होता. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आघाडी सरकारमधून बाहेर पडल्याचा आरोप बंडखोर आमदारांचा होता. अखेर, भाजपच्या पाठिंब्यावर बंडखोरांचे सरकार आले. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची आपण भेट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. राजकीय चर्चा यानंतर उधाण आले होते. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले असून ही भेट झालीच नसल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मी भेटल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे. ही बातमी संपूर्णपणे चुकीची असून त्यात अजिबात कोणतेही तथ्य नाही. या बातमीसोबत व्हायरल झालेला फोटो, हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलो असतानाचा आहे. आमच्यात अद्याप अशी कोणतीही भेट झालेली नसून याबाबत आलेल्या कोणत्याही बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असा खुलासा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.

सरकार सहा महिन्यांत कोसळेल - शरद पवार : महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकारला सत्तेपासून खाली ( Down from power ) खेचून राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, हे सरकार सहा महिन्यांमध्ये कोसळेल. त्यामुळे सर्व आमदार आणि नेत्यांनी मध्यवर्ती निवडणुकीच्या तयारीला ( Prepare for Midterm Elections ) लागा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि आमदारांना दिल्या आहेत. शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटर ( Meeting at Yashwantrao Chavan Center ) येथे सायंकाळी बैठक ( NCP meeting ) बोलावली होती. या बैठकीतून त्यांनी आपल्या नेत्यांना आणि आमदारांना या सूचना दिल्या आहेत.

नवीन सरकारमधील आमदार फुटण्याची शक्यता : काल विधिमंडळ विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर शरद पवार यांनी सायंकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदार, नेत्यांना संबोधित करताना सांगितले की, शिवसेनेमधून बंडखोरी करून गेलेल्या आमदारांची मंत्रिमंडळ वाटपानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरी केलेले आमदार स्वगृही परत येण्याची शक्यतादेखील शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपल्या मतदारसंघात असलेल्या कामांकडे लक्ष देण्याच्या सूचना शरद पवारांनी या बैठकीतून केल्या आहेत.

विधिमंडळ विशेष अधिवेशन पार पडले : नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विधिमंडळ विशेष अधिवेशन पार पडले. त्यामध्ये विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजप व शिंदे गटाचे राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी या निवडणुकीला विरोध केला होता. राज्यपालांनी बोलावलेल्या या निवडणुकीवरच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता. राज्यपालांच्या भूमिकेविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा - Youth died falling in mine: खदानीत पडून तरुणाचा मृत्यू, मुंबईतील दहिसर भागातील घटना

Last Updated :Jul 6, 2022, 2:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.