ETV Bharat / city

Har Ghar Tiranga खासदार नवनीत राणा यांनी फडकावला तिरंगा

author img

By

Published : Aug 13, 2022, 5:21 PM IST

Har Ghar Tiranga  Campaign
खासदार नवनीत राणा यांनी फडकावला तिरंगा

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांनी आज आपल्या घरावर तिरंगा फडकावुन हर घर तिरंगा अभियान Har Ghar Tiranga Campaign संपूर्ण अमरावती जिल्ह्यात यशस्वी करावे असे आवाहन अमरावतीकरांना केले.

अमरावती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांनी आज आपल्या घरावर तिरंगा फडकावला. तसेच हर घर तिरंगा अभियान Har Ghar Tiranga Campaign संपूर्ण अमरावती जिल्ह्यात यशस्वी करावे असे आवाहन अमरावतीकरांना केले.

प्रतिक्रीया व्यक्त करतांना खा. नवनीत राणा


राष्ट्रीय प्रतीकांचे केले वाटप खासदार नवनीत राणा यांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकावला. त्यानंतर शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांना राष्ट्रीय प्रतीक असणारे अनेक बॅचेस बिल्ले आधी साहित्यांचे वाटप केले. हातात तिरंगा झेंडा घेऊन खासदार नवनीत राणा यांनी देशभक्तीचा जोश उपस्थितांमध्ये निर्माण केला. भारत माता की जय वंदे मातरम असा जयघोष देखील खासदार नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला.


सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा संपूर्ण देशात महाउत्सव म्हणून साजरा केला जातो आहे. अमरावती शहरातही विद्यार्थ्यांनी भव्य रॅली काढून राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण केले आहे. माझ्या घरावर तिरंगा फडकला याचा मला अभिमान आहे. असा अभिमान प्रत्येकाला असावा. या राष्ट्रीय महाउत्सवात प्रत्येक अमरावतीकरांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील खासदार नवनीत राणा यांनी केले.

हेही वाचा Indian Independence Day उजनीतून पडणाऱ्या पाण्याला तिरंग्याचा साज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.