ETV Bharat / city

Police Arrested Teak Wood Smuggler : सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या 13 जणांवर अंजनगाव पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Oct 18, 2022, 7:38 PM IST

सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या 13 जणांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत सांगताना
सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या 13 जणांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत सांगताना

अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार सकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान पायी गस्तीवर असताना काही आदिवासी युवक सागवान (smuggling teak wood in Amravati) घेऊन येताना त्यांना दिसले. त्या युवकांची चौकशी करून ठाणेदाराने एकूण 33 हजार रुपयाचा सागवानचा माल जप्त (Seizure of stolen teak) केल्याने सागवान तस्करांमध्ये (action against teak smugglers) खळबळ उडाली. याप्रकरणी 13 जणांना (13 people smuggling teak wood) अंजनगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार सकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान पायी गस्तीवर असताना काही आदिवासी युवक सागवान (smuggling teak wood in Amravati) घेऊन येताना त्यांना दिसले. त्या युवकांची चौकशी करून ठाणेदाराने एकूण 33 हजार रुपयाचा सागवानचा माल जप्त (Seizure of stolen teak) केल्याने सागवान तस्करांमध्ये (action against teak smugglers) खळबळ उडाली. याप्रकरणी 13 जणांना (13 people smuggling teak wood) अंजनगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Amravati teak smuggler arrested) ( Police Arrested Teak Wood Smuggler)

सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या 13 जणांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत सांगताना


अशी झाली कारवाई : ठाणेदार दीपक वानखडे सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अंजनगाव येथील पाचपावली नजीक पायी फिरत असताना काही युवक सागवान चा माल घेऊन येताना दिसतात ठाणेदाराने त्यांच्यावर पाळत ठेवली शहरात काही आदिवासी युवक एका ठिकाणी जमलेले दिसल्याने त्यांना विचारपूस केली असता त्यांनी काकादरी येथून सागवान लाकड आणल्याचे सांगितले. आदिवासी लोकांच्या सांगण्यावरून काजीपुरा येथील अब्दुल तमील अब्दुल असलम यांच्याकडे लाकूड पुरवल्याचे त्यांनी सांगितले. यावरून अंजनगाव पोलिसांनी काजीपुरा येथील अब्दुल तमीज अब्दुल असलम यांच्याकडे तपासणी केली असता १२ सागवानी लाकडाचे साधारण आठ दहा फूट लांबीच्या नाठा आढळून आल्या. अंजनगाव पोलिसांनी सागवानी लाकडाचा मुद्दे मालाचा पंचनामा करून अंदाजे ३३ हजार ८८३ रुपयाचा सागवानचा माल ०.३८९ (घनमीटर लाकूड) व सर्व आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

या आरोपींवर कारवाई - पोलिसांनी ताब्यात घेणाऱ्यांमध्ये लाकूड घेणारा मुख्य आरोपी अब्दुल तमीज अब्दुल असलम (वय ३५) या काजीपुरा परिसरातील रहिवासी तसेच लाकूड पुरवणारे दादू दयाराम मावास्कर वय २२,भारत दयाराम कसदेकर वय १८,आकाश दयाराम जामोदकर वय १९ ,दयाराम मोतीराम कासदेकर वय ३५,निकेश सुकलाल जामुनकर वय २० ,सचिन शालिकराम सावरकर वय १९, गणेश मोतीलाल सावरकर वय २५ , शालिकराम मोतीलाल कासदेकर वय ३५ ,राजेंद्र राजू जामूनकर वय २३,राहुल बन्सी मावसकर वय २२,मंगाली मोतीलाल दहीकर ४० , गणेश मंगल कासदेकर वय ५० वर्ष सर्व राहणार काकरदरी ता. चिखलदरा यांना ताब्यात घेतले. तसेच पंचनामा करून मुद्देमाल व आरोपी यांच्या बद्दल वनपरिक्षेत्र कार्यालय दहिगाव यांना माहिती देऊन पुढील योग्य कार्यवाही करता आरोपींना व मुद्देमाल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला. ही कार्यवाही ठाणेदार दीपक वानखडे पोहेका विजय शेवतकर, राजेश जांबेकर सुमित सरदार, राजू कासदेकर, विशाल थोरात यांनी केली. तसेच पुढील कार्यवाही वन विभागाचे वनपरिक्षेत्र दहिगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस डी राठोड यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक व्ही एस सोडगीर, वनसेवक एस एन उगले, वनमजूर बि.जी महरकर हे करित आहेत. आरोपीवर वन अधिनियम १९२७ कलम २६ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आसल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.


सागवान तस्करीकडे वन विभागाचे दुर्लक्ष - अंजनगाव सुर्जी शहरात तसेच ग्रामीण भागात सातपुड्यातून मोठ्या प्रमाणात सागवान चोरून आणल्या जात असताना वन विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांमध्ये केल्या जात आहे. संबंधित अधिकाऱ्याचे सागवान तस्करी कडे लक्ष नसल्याची चर्चा असून त्यामुळेच मेळघाटातून चोरटे सागवान घेऊन सर्रास शहरात येत असल्याचे बोलल्या जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.