Republic Day Sale 2023: ऑनलाइन सेल्सवर धमाकेदार ऑफर्स.. ९ हजारात टॅबलेट आणि बरंच काही

author img

By

Published : Jan 25, 2023, 3:49 PM IST

Updated : Jan 25, 2023, 4:57 PM IST

online sale

रिपब्लिक डे सेल 2023 च्या निमित्ताने सध्या धमाकेदार ऑफर्स पहायला मिळत आहेत. याचा फायदा घेऊन, तुम्ही आयफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच, टॅबलेट, लॅपटॉप आणि इतर घरगुती वस्तू मोठ्या सवलतींसह खरेदी करू शकता. यासंबंधी सर्व तपशील जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी.(Explosive offers on online sale )

मुंबई : इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स खरेदी करण्यासाठी बरेच लोक ऑफर्स आणि डिस्काउंटची वाट पाहत असतात. प्रसिद्ध ई-कॉमर्स साइट्सने प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ऑफर्स आणल्या आहेत. तर दुसरीकडे, तर काही जन सुरुवातीपासून सवलती आणि ऑफरसाठी ओळखले जाते. अशा परिस्थितीत सगळ्याच साईट्सनी वार्षिक मेगा रिपब्लिक डे सेलची घोषणा केली आहे. यादरम्यान गॅजेट्स, मनोरंजन तसेच घरगुती आणि स्वयंपाकघरातील उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे.

गॅझेट्सवर मिळतेय भरघोस सूट: रिपब्लिक डे सेलमध्ये तुम्हाला अनेक गॅझेट आणि मोठ्या वस्तुंवर बँक कार्ड धारकांसाठी कॅशबॅकसह प्रारंभिक किमतीत वस्तु उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ॲपलच्या चाहत्यांना खूश करण्यासाठी, काही साईट्स सेल्स ॲपल केअर वर फ्लॅट 20 टक्के सूट देखील देत आहे. वेगवेगळे गॅझेट्स आणि Airpods खरेदीवर विशेष सूट आहे. या दरम्यान, सर्वात जास्त मागणी असलेले मोबाईल स्वस्तात उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे दाखवले जात आहे.

होम अप्लायन्सेसवर ऑफर्स: प्रजासत्ताक दिनाच्या सेलमध्ये होम अप्लायन्सेसवरही उत्तम ऑफर देण्यात आल्या आहेत. 10,490 रुपयांपासून सुरू होणारे रेफ्रिजरेटर, 26,990 रुपयांपासून सुरू होणारे एअर कंडिशनर याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ओव्हन रु.4,499 पासून उपलब्ध आहेत. इथून केटल्स आणि कॉफी मेकर फक्त रु. ६९९ च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येतील. तर ब्लेंडर, मिक्सर, ज्युसर ४९ टक्के सवलतीत उपलब्ध आहेत. सँडविच मेकर आणि पॉप अप टोस्टरवर 50 टक्क्यांपर्यंत सूट आणि वॉटर प्युरिफायरवर 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

मेगा रिपब्लिक डे सेलचा लाभ कसा घ्यावा: रिपब्लिक डे सेल डीलचा लाभ घेण्यासाठी, स्टोअरला भेट देऊ शकता किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. यात तुम्हाला वेगवेगळ्या बँकेच्या कार्डधारकांना तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड हप्त्यावरील व्यवहारांवर झटपट सूट आणि तसेच क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवर ही वेगवेगळ्या पध्दतीची सूट मिळत आहे. वेगवेगळ्या योजना दिल्या जात आहेत.याशिवाय, एचएसबीसी बँक, आयडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, येस बँक आणि इतर वापरून व्यवहारांवर सूट देखील दिली जाईल.

हेही वाचा: Share Market Update शेअर बाजारात या तीन कंपन्यांच्या शेअर्सने घेतली उसळी या कंपन्यांचे शेअर्स घसरले

Last Updated :Jan 25, 2023, 4:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.