Share Market Update: शेअर बाजारात 'या' तीन कंपन्यांच्या शेअर्सने घेतली उसळी.. 'या' कंपन्यांचे शेअर्स घसरले

Share Market Update: शेअर बाजारात 'या' तीन कंपन्यांच्या शेअर्सने घेतली उसळी.. 'या' कंपन्यांचे शेअर्स घसरले
देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीला लागलेला ब्रेक फार काळ टिकू शकला नाही. शेअर बाजारात पुन्हा एकदा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. BSE सेन्सेक्स 268 अंकांनी घसरला तर NSE निफ्टीने 90 अंकांची घसरण नोंदवली.
मुंबई: कमजोर जागतिक कल असताना अर्थ, तेल आणि आयटी समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे प्रमुख इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरले. या दरम्यान बीएसई सेन्सेक्स 268 अंकांनी किंवा 0.44 टक्क्यांनी घसरून 60,709.93 अंकांवर आला. NSE निफ्टी 90.25 अंकांनी म्हणजेच 0.5 टक्क्यांनी घसरून 18,028.05 वर स्थिरावला आहे. शेअर बाजारात काही प्रमाणात घसरण दिसून येत आहे.
मोठ्या कंपन्यांचे शेअर्स पडले: अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, एल अँड टी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस आणि टीसीएस हे सेन्सेक्सवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसरीकडे, टाटा स्टील, एचयूएल आणि मारुतीमध्ये वाढ दिसून आली आहे. घसरण झालेल्या बड्या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांच्या शेअर्सची किंमत आज घसरण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण: दरम्यान, जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.43 टक्क्यांनी घसरून 86.48 डॉलर प्रति बॅरल होता. भारतासाठी कच्च्या तेलाची प्रभावी किंमत 2.69 टक्क्यांनी घसरून $79.98 प्रति बॅरल झाली आहे. शेअर बाजाराच्या सध्याच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) मंगळवारी निव्वळ 760.51 कोटी रुपयांचे समभाग विकले. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण ही भारतासाठी चांगली बाब आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी 81.50 पर्यंत वाढला: जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यामुळे बुधवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी 81.50 पर्यंत वाढला. तथापि, देशांतर्गत इक्विटी बाजारातील सकाळच्या सत्रात झालेला तोटा आणि कच्च्या तेलाच्या किमतीत जागतिक बाजारात झालेली वाढ यामुळे रुपयाचा नफा मर्यादित झाला. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया ८१.६२ वर उघडला आणि ८१.४९ वर पोहोचला. वृत्त लिहिपर्यंत रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 81.50 वर होता. मंगळवारी रुपया 81.70 वर बंद झाला होता. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक 0.04 टक्क्यांनी घसरून 101.88 वर आला आहे.
जागतिक मंदीचे संकेत: येत्या काही महिन्यांत जागतिक मंदीचे संकेत मिळत आहेत. अनेक मोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करतील. ज्यांचे पगार जास्त आहेत अशा बड्या टेक कंपन्यांमध्ये जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी कपातीचा फटका बसणार आहे, असे द इन्फॉर्मेशनच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे शेअर बाजारातही काही प्रमाणात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
