ETV Bharat / business

Today Gold Silver Rate: अर्थसंकल्पापूर्वीच आनंदाची बातमी, सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण

author img

By

Published : Feb 1, 2023, 6:45 AM IST

Today Gold Silver Rate
सोने चांदी दर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहे. त्यांच्याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत सोने स्वस्त झाले आहे. आज दिल्लीत सोन्याचा भाव 57,000 च्या खाली घसरला आहे. तर जाणून घ्या आजचे नवे दर.

मुंबई: सोने चांदीच्या किंमतींवर परिणाम करणारे घटक म्हणजे महागाई महागाईच्या काळात आपले चलन कमकुवत होते आणि अशा परिस्थितीत लोक सोन्याच्या रूपात पैसे ठेवतात. यामुळे सोन्याची मागणी वाढते ज्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते. सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेने आणलेल्या आर्थिक धोरणातील बदलांवर अवलंबून असते. ज्यामुळे दिल्लीतील सध्याच्या सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. आरबीआयने व्याजदर वाढवल्यास, लोक बचत खाती, मुदत ठेवी, सरकारी रोखे इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे सोने विकण्यास सुरुवात करतात.

Gold Silver Rate
सोने चांदी दर

काय आहे आजचा भाव?: आज सोनेचे दर स्थिर आहेत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या एक आणि आठ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे पाहु या. 22 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,250, 8 ग्रॅम ₹42,000, 10 ग्रॅम ₹52,500, 100 ग्रॅम ₹5,25,500 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,724, 8 ग्रॅम ₹45,816, 10 ग्रॅम ₹57,270, 100 ग्रॅम ₹5,25,000 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,380, मुंबईत ₹52,650, दिल्लीत ₹52,500, कोलकाता ₹52,500, हैदराबाद ₹52,500 आहेत.

  • ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>

चांदीचे आजचे दर: चांदीच्या भावाचे बोलायचे झाले तर यामध्येही घसरण झाली आहे. कालपेक्षा आज चांदीच्या दरात काही बदल झालेला नाही.आज चांदी 1 ग्रॅम ₹72.30, 8 ग्रॅम ₹578.40, 10 ग्रॅम ₹723, 100 ग्रॅम ₹7,230, 1 किलो ₹72,300 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹745, मुंबईत ₹723, दिल्लीत ₹723, कोलकाता ₹723, बंगळुरू ₹745, हैद्राबाद ₹745 आहेत.

हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो? : सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. अमेरिकन डॉलरच्या कामगिरीचा भारतातील सोन्याच्या दरावर खूप प्रभाव पडतो. डॉलरच्या घसरणीमुळे रुपयात, सोन्याच्या किंमतीत वाढ होईल आणि डॉलरची किंमत वाढल्यास उलट होऊ शकते.

हेही वाचा: Today Gold Silver Rate खरेदीकरांसाठी सुवर्ण काळ जाणून घ्या आजचे सोने चांदीचे नवे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.