ETV Bharat / business

2000 Currency Note : आता घरबसल्या नागरिक जमा करू शकतात दोन हजार रुपयाच्या नोटा, अ‍ॅमेझॉनने उपलब्ध केली सुविधा

author img

By

Published : Jun 22, 2023, 4:22 PM IST

2000 Currency Note
संग्रहित छायाचित्र

तुमच्याकडे दोन हजार रुपयाच्या नोटा असतील आणि तुम्हाला त्या बदलायच्या असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अ‍ॅमेझॉनने घरबसल्या दोन हजार रुपयाच्या नोटा बदलण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली. मात्र, नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, नागरिक बँकेत जाऊन नोटा बदलू शकतात. बँकांव्यतिरिक्त पेट्रोल पंप आणि सोन्याच्या दुकानांवर नागरिक 2000 रुपयांच्या नोटा खर्च करत आहेत. मात्र तुम्हाला आता नोटा बदलण्याचे काम घरी बसूनही करता येणार आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे.

काय आहे अ‍ॅमेझॉनची स्कीम : Amazon ने बुधवारी Amazon Pay कॅश लोडची सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत तुम्ही Amazon Pay वर 2000 रुपयांच्या नोटा जमा करू शकता. ही रक्कम एका महिन्यात 50 हजार रुपयांपर्यंत जमा करता येते. रोख जमा केल्यानंतर Amazon वितरण एजंट रोख गोळा करण्यासाठी तुमच्या घरी येऊन तुमच्या Amazon Pay खात्यात पैसे जमा करतील.

कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय : अ‍ॅमेझॉनने सुरू केलेल्या या पर्यायाचा नागरिकांना फायदाच होणार आहे. त्याशिवाय Amazon वरून कोणतीही वस्तू खरेदी केल्यास तुम्ही पेमेंटमध्ये कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडू शकता. हे फीचर अ‍ॅमेझॉन पे बॅलन्समध्ये रोख रक्कम जमा करण्याची सुविधा देते. माल आल्यावर डिलिव्हरी एजंटला तुमच्या Amazon Pay खात्यामध्ये रोख रक्कम जमा करण्याचे सांगावे लागेल. त्यासह रोख स्वरूपात 2 हजार रुपयाची नोट डिलिव्हरी एजंट देता येईल. वस्तूंची किंमत वजा केल्यानंतर उर्वरित पैसे तुमच्या Amazon Pay खात्यामध्ये येतील. यानंतर तुम्ही Amazon अ‍ॅपवर जाऊन तुमचा Amazon Pay शिल्लक तपासू शकता.

खरेदीसाठी वापरू शकता शिल्लक रक्कम : एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी Amazon Pay शिल्लक रक्कम तुम्ही वापरु शकता. यासह तुम्ही पैसे देण्यासाठी दुकानांमध्ये स्कॅन करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही या बॅलन्समधून पैसे ट्रान्सफर करू शकता आणि ही रक्कम तुमच्या बँक खात्यातही ट्रान्सफर करू शकत असल्याचेही अ‍ॅमेझॉनने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -

  1. 2000 Note Exchange : 2000 च्या नोट बदलण्यासाठी बॅंकांकडून ओळखपत्राची मागणी, नागरिकांमध्ये संभ्रम
  2. 2000 Note Ban : 8 दिवसांत जमा झाले 'इतके' कोटी रुपये, SBI च्या चेअरमनचा खुलासा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.