ETV Bharat / business

सोन्याच्या दरात वाढ ; चांदी प्रति किलो 275 रुपयांनी स्वस्त

author img

By

Published : Apr 9, 2021, 7:43 PM IST

Updated : Apr 9, 2021, 10:17 PM IST

gold rate news
सोने दर न्यूज

सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर प्रति किलो 275 रुपयांनी घसरून 6,253 रुपये आहे.

नवी दिल्ली - सोन्याच्या दरात दिल्लीत प्रति तोळा 97 रुपयांची वाढ झाली आहे. हे दर वधारून सोन्याचा दर प्रति तोळा 46,257 रुपये आहे. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत घसरल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 46,160 रुपये होता.

सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर प्रति किलो 275 रुपयांनी घसरून 6,253 रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 66,528 रुपये होता.

हेही वाचा-कोरोनाच्या चाचणीकरता जॉन्सन अँड जॉन्सनची भारत सरकारबरोबर चर्चा सुरू

सोन्याच्या व्यवहारात नफा नोंदविण्याकडे कल-

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले की, 24 कॅरेट सोन्याचे दर दिल्लीत 97 रुपयांनी वाढले आहेत. बाजार खुला होताना रुपयाचे मूल्य डॉलरच्या 17 पैशांनी घसरले होते. त्यामुळे एका डॉलरसाठी 74.75 रुपये मूल्य झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस 1,745 डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस 25.15 डॉलर आहेत. डॉलरचे मूल्य वधारत असताना सोन्याच्या व्यवहारात नफा नोंदविण्याचे प्रमाण दिसून आल्याचेही पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा-'कोरोना लसीकरण सर्वांसाठी' व्हॉट्सअपचे नवीन स्टिकर पॅक लाँच

शेअर बाजार निर्देशांकात घसरण-

शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 155 अंशाने घसरला आहे. आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि मोठ्या कंपन्यांचे शेअर घसरले आहेत. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीने शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे.

Last Updated :Apr 9, 2021, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.