ETV Bharat / business

आर्थिक वर्ष २०२१ मध्ये विकासदर ५.५ टक्के राहिल; इंडिया रेटिंग्जचा अंदाज

author img

By

Published : Jan 22, 2020, 3:18 PM IST

GDP
जीडीपी

इंडिया रेटिंग्जने राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अंदाजाहून देशाचा जीडीपी अधिक राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या संकटात सापडल्याने वित्तपुरवठा विस्कळित झाल्याचे इंडिया रेटिंग्जने अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेची घसरण होत असताना इंडिया रेटिंग्ज आणि रिसर्च या पतमानांकन संस्थेने पुढील आर्थिक वर्षाबाबत अंशत: दिलासादायक अंदाज केला आहे. पुढील आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ५.५ राहिल, असा या पतमानांकन संस्थेने अंदाज केला आहे.


इंडिया रेटिंग्जने राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अंदाजाहून देशाचा जीडीपी अधिक राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या संकटात सापडल्याने वित्तपुरवठा विस्कळित झाल्याचे इंडिया रेटिंग्जने अहवालात म्हटले आहे. कौटुंबिक उत्पनाच्या वृद्धीदरात घट झाली आहे. तसेच विविध वादावर तोडगा काढण्यासाठी असलेल्या व्यवस्थेचा अभाव यामुळे भांडवल अडकून राहिल्याचे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा-मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या संकटात पडली भर; 'हे' आहे कारण

पुढील आर्थिक वर्षात काही सुधारणा अपेक्षित आहेत. मात्र, जोखीम कायम राहणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून भारतीय अर्थव्यवस्था कमी उपभोक्तता (कन्झम्पशन) आणि गुंतवणुकीची कमी मागणी या समस्येत अडकली आहे. अमेरिका-चीनमधील व्यापार विषयक चर्चा अशा बाह्य वातावरणाने सुधारणा होवून पुढील आर्थिक वर्षात विकासदर वाढेल, असे इंडिया रेटिंग्जने अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा-व्होडाफोनचा फेसबुकला धक्का; लिब्रा क्रिप्टोचलनामधून घेतली माघार

Intro:Body:

Dummy Business news


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.