ETV Bharat / business

व्होडाफोनचा फेसबुकला धक्का; लिब्रा क्रिप्टोचलनामधून घेतली माघार

author img

By

Published : Jan 22, 2020, 1:26 PM IST

व्होडाफोन ही असोसिएशनची सदस्य राहिली नसल्याचे लिब्रा असोसिएशनने म्हटले आहे. लिब्राचे प्रशासन आणि तंत्रज्ञान हे लिब्राचे देयक व्यवहार मजबूत राहण्याची खात्री देत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.

Vodafone
व्होडाफोन

सॅन फ्रान्सिस्को - फेसबुकचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला 'लिब्रा' या क्रिप्टोचलनाच्या प्रकल्पाला आणखी एक धक्का बसला आहे. दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन कंपनी लिब्रा प्रकल्पामधून बाहेर पडली आहे.


व्होडाफोन ही असोसिएशनची सदस्य राहिली नसल्याचे लिब्रा असोसिएशनने म्हटले आहे. लिब्राचे प्रशासन आणि तंत्रज्ञान हे लिब्राचे देयक व्यवहार मजुबत राहण्याची खात्री देत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. पेपल, मास्टरकार्ड, व्हिसा, मॅरकॅडो पॅगो, ईबे, स्ट्राईप आणि बुकिंग होल्डिंगने लिब्रा प्रकल्पाला नकारघंटा वाजविली आहे. गेल्या वर्षी फेसबुक कंपनीने ऑक्टोबरमध्ये लिब्रा या क्रिप्टोचलनाची सुरुवात करण्यासाठी लिब्रा असोसिएशची स्थापना केली.

हेही वाचा-केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध हटविणार?

वापरकर्त्यांची गोपनीय माहिती आणि नियामक संस्थांकडून होणारे कठोर परीक्षण यामुळे कंपन्यांनी लिब्रामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. लिब्राच्या देयक व्यवहाराची व्यवस्था ही सुरक्षित, पारदर्शी, ग्राहकस्नेही राहण्यासाठी काम सुरू राहणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. असोसिशएनमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील १,५०० कंपन्यांनी नी स्वारस्य दाखविले आहे.

हेही वाचा-५जीच्या दहापट ६जीचे वेगवान इंटरनेट; 'या' देशात सुरू करण्याचे प्रयत्न


काय आहे लिब्रा?
लिब्रा ही फेसबुकच्या मालकीचे क्रिप्टोचलन म्हणजे आभासी चलन असणार आहे. त्यामधून वापरकर्त्याला आर्थिक व्यवहार करता येणार आहेत.

Intro:Body:

Dummy Business news


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.