ETV Bharat / business

मारुती सुझुकी इंडियाच्या वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांची वाढ

author img

By

Published : Sep 7, 2020, 8:27 PM IST

गतवर्षी ऑगस्टमध्ये मारुती सुझुकीच्या एकूण १ लाख ११ हजार ३७० वाहनांची विक्री झाली होती. यंदा ऑगस्टमध्ये एकूण १ लाख २३ हजार ७६९ वाहनांची विक्री झाली आहे.

मारुती सुझुकी
मारुती सुझुकी

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी कोरोना महामारीच्या आर्थिक संकटातून सावरत आहे. मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांची वाढ झाली आहे.

गतवर्षी ऑगस्टमध्ये मारुती सुझुकीच्या एकूण १ लाख ११ हजार ३७० वाहनांची विक्री झाली होती. यंदा ऑगस्टमध्ये एकूण १ लाख २३ हजार ७६९ वाहनांची विक्री झाली आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये १ लाख १० हजार २१४ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. यंदा ऑगस्ट २०२० मध्ये १ लाख २१ हजार ३८१ प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. त्यामुळे प्रवासी वाहनांच्या विक्रीत १० टक्क्यांची वाढ झाली आहे.

हेही वाचा-पर्यटन क्षेत्रासाठी सरकारने तत्काळ मदत करावी; आयएटीओची मागणी

यंदा ऑगस्टमध्ये अल्टो आणि एस-प्रेस्सो या लहान कारची एकूण २२ हजार २०८ विक्री झाली. गतवर्षी ऑगस्टमध्ये एकूण १३ हजार ८१४ वाहनांची विक्री झाली. लहान कारच्या विक्रीत ६१ टक्क्यांची वाढ झाली आहे. कॉम्पॅक्ट कार, वॅग्नरआर, सेलेरिओ, इग्नीस, स्विफ्ट, बेलेनो व डिझाईरच्या वाहन विक्रीत यंदा ऑगस्टमध्ये किंचित वाढ झाली आहे. तर जिप्सी, इर्टिगा, एस-क्रॉस, वितारा ब्रेझ्झा आणि एक्सएल ६च्या वाहन विक्रीत ४४ टक्क्यांची ऑगस्टमध्ये वाढ झाली आहे. मारुती सुझुकीच्या उत्पादनात वाणिज्य वाहनांच्या विक्रीतही वाढ झाली आहे.

हेही वाचा-आरबीआय करणार १० हजार कोटींच्या सरकारी रोख्यांची खरेदी-विक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.