ETV Bharat / business

Ashneer Grover Resigns : भारतपेचे एमडी अश्नीर ग्रोव्हर यांचा राजीनामा

author img

By

Published : Mar 1, 2022, 12:52 PM IST

ASHNEER GROVER
ASHNEER GROVER

आगामी बोर्ड बैठकीचा अजेंडा समजल्यावर अश्नीर ग्रोव्हर यांनी भारतपेचे व्यवस्थापकीय संचालक आणि बोर्ड संचालक पदाचा राजीनामा ( Ashneer Grover Resign ) दिले आहे. नुकतेच ग्रोव्हर शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या लोकप्रिय रिअलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसले होते.

नवी दिल्ली : फिनटेक फर्म (Fintech firm) BharatPe चे व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर ( Ashneer Grover ) यांनी आगामी बोर्ड बैठकीचा अजेंडा मिळाल्यानंतर लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बोर्डाच्या बैठकीच्या अजेंड्यात त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे PwC या सल्लागार कंपनीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

"आगामी बोर्ड मीटिंगचा अजेंडा समजल्यावर अशनीर ग्रोव्हर यांनी भारतपेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून राजीनामा दिल्याचे भारतपे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. अजेंड्यात PwC चा अहवाल सादर करणे आणि त्या आधारावर केलेल्या कारवाईचा विचार करणे याचा समावेश येतो. अहवालातील निष्कर्षांच्या आधारे कारवाई करण्याचे अधिकार मंडळाने राखून ठेवले आहेत.

आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी

आश्नीर ग्रेव्हर (Bharatpe MD Ashneer Grover) यांना भारतातील सर्वात यशस्वी उद्योजक गणले जाते. त्यांनी आयआयटी दिल्ली मधून बी टेक केल्यावर खरगपूर येथून एमबीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर अनेक राष्ट्रीय आांतरराष्ट्रीय कंपन्यांचे विविध विभागांचे प्रमुखपदेही सांभाळली. नुकतेच त्यांनी शार्क टँक इंडिया या लोकप्रिय रिअलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसले होते.

हेही वाचा - STOCK MARKET : सेन्सेक्स 388.76 अंकांनी उसळा, तर निफ्टीने 16,000 अंकांचा टप्पा ओलांडला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.