ETV Bharat / business

STOCK MARKET : सेन्सेक्स 388.76 अंकांनी उसळा, तर निफ्टीने 16,000 अंकांचा टप्पा ओलांडला

author img

By

Published : Feb 28, 2022, 8:06 PM IST

बीएसई ( Bombay Stock Exchange ) सेन्सेक्स 388.76 अंकांनी उसळी घेत 56,247.28 वर आणि एनएसई निफ्टी 135.50 अंकांनी वाढून 16,793.90 वर बंद झाला.

Share Market
Share Market

मुंबई : रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतरही बीएसई सेन्सेक्स 388.76 अंकांनी उसळी घेत 56,247.28 वर बंद झाला. त्याचबरोबर एनएसई ( National Stock Exchange ) निफ्टी 135.50 अंकांच्या वाढी बरोबर 16,793.90 अंकांवर व्यवहार करत होता.

दरम्यान, आज (सोमवार) गुंतवणूकदारांच्या कमकुवत भावनांमुळे प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स ( Share Index Sensex ) सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 870 अंकांनी घसरला होता. आज बाजार उघडताच 55,000 च्या पातळीच्या खाली घसरले होते. या दरम्यान 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स तो 869.33 अंकांनी किंवा 1.56 टक्क्यांनी घसरून 54,989.19 वर होता. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी देखील 233.80 अंक किंवा 1.40 टक्क्यांनी घसरून 16,424.60 वर आला. पण त्यानंतर देशांतर्गत शेअर बाजारात थोडीशी उसळी बघायला मिळाली.

सेन्सेक्स पॉवरग्रीड, टाटा स्टील आणि सन फार्मा ( Tata Steel and Sun Pharma ) वगळता सर्व समभाग लाल रंगात होते. या अगोदर शुक्रवारी 30 शेअर्सवाले बीएसई सेन्सेक्स तो 1,328.61 अंकांनी किंवा 2.44 टक्क्यांनी वाढून 55,858.52 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, व्यापक NSE निफ्टी 410.45 अंकांनी किंवा 2.53 टक्क्यांनी वाढून 16,658.40 वर होता. ब्रेंट क्रूड फ्युचर्स प्रति बॅरल $99.61 वर पाच टक्क्यांनी वाढले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.