ETV Bharat / business

ऑडिटमधील हेराफेरीला बसणार आळा; १ एप्रिलपासून 'हा' बदल होणार लागू

author img

By

Published : Mar 30, 2021, 6:56 PM IST

New accounting rules
नवीन ऑडिट नियम

कंपनी व्यवहार मंत्रालयाने आठवडाभरापूर्वी अधिसूचना काढून ऑडिट ट्रेल तयार करू शकणाऱ्या सॉफ्टवेअरचा लेखापरीक्षणासाठी वापर करण्याचे आदेश दिले आहेत. ऑडिट ट्रेलमध्ये सॉफ्टेवेअरमधील प्रत्येक नोंदीची माहिती सुरक्षित राहते.

नवी दिल्ली - लेखापरीक्षणात (अकाउंट) १ एप्रिल म्हणजे नवीन आर्थिक वर्षात फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. या नियमानुसार मागील तारखेतील नोंदीसह सर्व प्रकारच्या नोंदी सॉफ्टवेअरमध्ये सुरक्षित ठेवावे लागणार आहेत. लेखापरीक्षणाच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रत्येक बदलाची नोंद ठेवावी लागणार आहे.

कंपनी व्यवहार मंत्रालयाने आठवडाभरापूर्वी अधिसूचना काढून ऑडिट ट्रेल तयार करू शकणाऱ्या सॉफ्टवेअरचा लेखापरीक्षणासाठी वापर करण्याचे आदेश दिले आहेत. ऑडिट ट्रेलमध्ये सॉफ्टवेअरमधील प्रत्येक नोंदीची माहिती सुरक्षित राहते. त्यामुळे कंपन्यांकडून लेखापरीक्षणात होणारी फसवणुकीचा सरकारला तपास करता येणार आहे. जीएसटीच्या परताव्यामधील घोटाळे समोर आल्याने जीएसटी परिषदेने ऑडिट ट्रेल तयार करू शकणाऱ्या सॉफ्टवेअरची शिफारस केली होती.

हेही वाचा-टाटा ग्रुपबरोबर कायदेशीर लढाई हरल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया

ऑडिट ट्रेलमुळे बनावट बिलांना आळा बसेल

दिल्लीमधील एएमआरजी असोसिएट्शमध्ये सनदी लेखापरीक्षक (सीए) म्हणून कार्यरत असलेले रजनत मोहन म्हणाले की, कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक बुक अकाउंटमध्ये ऑडिट ट्रेल असलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे कंपन्यांना ऑडिट ट्रेलबाबतची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. यापूर्वी बनावट जीएसटी बिले तयार करून सरकारची फसवणूक केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. ऑडिट ट्रेलमुळे अशा बनावट बिलांना आळा बसेल, अशी सरकारला अपेक्षा आहे.

हेही वाचा-टाटा ग्रुपबरोबर कायदेशीर लढाई हरल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.