ETV Bharat / business

अॅमेझॉन इंडियाचे वेबसाईटसह अॅप दोन तास पडले बंद; ग्राहकांना त्रास

author img

By

Published : May 20, 2021, 3:12 PM IST

Amazon
अॅमेझॉन

बंद पडणाऱ्या वेबसाईट व अॅपविषयी अपडेट माहिती घेणाऱ्या डाऊनडिटेक्टर वेबसाईटच्या माहितीनुसार सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत अॅमेझॉन अॅप व वेबसाईटची सेवा विस्कळित झाली होती.

नवी दिल्ली - अॅमेझॉन वेबसाईट व अॅपची सेवा आज देशाच्या काही भागात विस्कळित झाली. त्यामुळे वापरकर्त्याला शॉपिंग करताना अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अॅमेझॉन वेबसाईट सुमारे दोन तास बंद होती.

बंद पडणाऱ्या वेबसाईट व अॅपविषयी अपडेट माहिती घेणाऱ्या डाऊनडिटेक्टर वेबसाईटच्या माहितीनुसार सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत अॅमेझॉन अॅप व वेबसाईटची सेवा विस्कळित झाली होती. अनेकांना वेबसाईट लॉग इन आणि लॉग आऊट करताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. नेमके कोणत्या कारणांमुळे अॅमेझॉनची वेबसाईट व अॅप बंद होते, याची माहिती कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही.

हेही वाचा-अॅपलला मिळणार तगडी टक्कर; गुगल सॅमसंगबरोबर स्मार्टवॉचच्या तंत्रज्ञानाकरिता एकत्र

एका वापरकर्त्याने याविषयी ट्विटरवर माहिती दिली आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले, की अॅमेझॉन अॅपमध्ये काही तांत्रिक त्रुटी उद्भवल्या होत्या. मलाच नाही, तर माझ्या मित्रांनाही सकाळपासून क्लिक करून अॅमेझॉनवरून पुस्तके घेता येत नव्हते. याबाबत लक्ष द्यावे, अशी वापरकर्त्याने विनंती केली आहे. तर दुसऱ्या वापरकरत्याने अॅमेझॉन इंडिया काही तांत्रिक गोष्टींना सामोरे जात आहे का? असा प्रश्ना विचारला. ऑर्डर करण्यात अडचणी येत असल्याचे या वापरकर्त्याने म्हटले आहे.

हेही वाचा-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाकरिता १ लाख डोस मिळण्याची विप्रोला अपेक्षा

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये अॅमेझॉन वेब सर्व्हिसच्या (एडब्ल्यूएस) वेबसाईटमध्ये अमेरिकेत तांत्रिक त्रुटी दिसून आल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून अॅमेझॉनच्या वेबसाईट व अॅप काही तास बंद राहिले होते. त्यावेळी कायनेसिस डाटा सिस्टिममधील त्रुटी दूर केल्याचे अॅमेझॉनने म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.