ETV Bharat / briefs

१७ वर्षांच्या रियान परागने घडविला इतिहास, केला नवा विक्रम

author img

By

Published : May 4, 2019, 9:15 PM IST

रियान पराग

रियान परागने १७ वर्षे आणि १७५ दिवसांचा असताना अर्धशतक ठोकत पृथ्वी शॉ आणि संजू सॅमसन यांना पाठीमागे टाकले आहे.

नवी दिल्ली - राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू रियान परागने आयपीएलमध्ये नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. रियान परागने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना ४९ चेंडूत अर्धशतक ठोकून इतिहास घडविला. रियान पराग या आयपीएलमधील सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम संजू सॅमसनच्या नावावर होता.


संजू सॅमसनने यापूर्वी १८ वर्षे १६९ दिवसांचा असताना २०१३ साली अर्धशतक ठोकले होते. संजूच्या या विक्रमाची पृथ्वी शॉने गेल्या वर्षे अर्धशतक ठोकून बरोबरी केली होती. रियान परागने १७ वर्षे आणि १७५ दिवसांचा असताना अर्धशतक ठोकत पृथ्वी शॉ आणि संजू सॅमसन यांना पाठीमागे टाकले आहे.


मूळचा आसामचा असलेल्या रियान परागने दिल्लीविरुद्ध खेळताना ४९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. त्याच्या अर्धशतकामुळे राजस्थानने ११५ धावांपर्यंत मजल मारली. यापूर्वी रियानचे अर्धशतक थोडक्यात हुकले होते.

Intro:Body:

Sports 09


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.