ETV Bharat / bharat

Cut The Woman's Nose: विनयभंगाचा गुन्हा मागे न घेतल्याने शाहजहांपूरमध्ये तरुणाने महिलेचे नाक कापले

author img

By

Published : Apr 4, 2023, 10:23 PM IST

उत्तर प्रदेशातील शाहजहानपूरमध्ये ही घटना घडली. तीन वर्षांपूर्वी येथील एका तरुणाने गावातील महिलेचा विनयभंग केला होता. त्यावेळी महिलेने तरुणावर गुन्हा दाखल केला होता. तोच खटला मागे घेण्यासाठी तरुणावर दबाव टाकला जात होता.

Cut The Woman's Nose
File Photo

नई दिल्ली : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये विनयभंगाचा गुन्हा मागे न घेतल्याने आरोपी तरुणाने महिलेचे नाक कापले. महिला आपल्या घरी जात असताना रस्त्यात हे कृत्य केले आहे. त्याने त्या महिलेचे नाक कापल्याने महिला जागीच बेशुद्ध पडली. घाईघाईत कुटुंबीयांनी महिलेला घेऊन पोलीस ठाणे गाठले, तेथून पोलिसांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल : महिलेने तीन वर्षांपूर्वी या तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. हा खटला मागे घेण्यासाठी तरुणाने अनेकवेळा महिलेचे नाक कापण्याची धमकी दिली होती. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून, आरोपी तरुणाला अटक केली आहे. शाहजहांपूर जिल्ह्यातील खुटार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे.

हल्ल्यात महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली : गावात सोमवारी सायंकाळी महिला बाजारातून खरेदीसाठी जात होती. दरम्यान, गावात राहणाऱ्या राजेश याने महिलेला घेराव घातला आणि केस मागे घेण्याबाबत बोलू लागला. महिलेला विरोध केल्यावर दबंगने गहू कापण्याच्या विळ्याने महिलेचे नाक कापले. या हल्ल्यात महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने रस्त्याच्या मधोमध बेशुद्ध पडली.

आरोपी राजेश याने महिलेचा विनयभंग केला होता : तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या माहितीवरून कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. महिलेचे कापलेले नाक घेऊन नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठले. महिलेची स्थिती पाहून पोलिसांनी तिला प्रथम रुग्णालयात दाखल केले. तीन वर्षांपूर्वी आरोपी राजेश याने महिलेचा विनयभंग केला होता, त्यामुळे महिलेने आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी राजेशला अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी एसपी ग्रामीण संजीव वाजपेयी सांगतात की, राजेश नावाच्या तरुणाने एका महिलेचे नाक धारदार शस्त्राने कापले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : 70 वर्षीय महिलेमुळे टळला मोठा अपघात! वेळीच ट्रेनला थांबवून वाचवले हजारो प्रवाशांचे प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.