ETV Bharat / bharat

PM Narendra Modi Rajya Sabha Speech : शरद पवारांचंही सरकार पाडलं! मोदींनी वाचला काँग्रेसचा इतिहास

author img

By

Published : Feb 9, 2023, 5:04 PM IST

Updated : Feb 9, 2023, 5:21 PM IST

PM Modi Rajya Sabha Speech
शरद पवारांचही सरकार पाडल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत बोलताना विरोधकांनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी जुने दाखले देत काँग्रेसवर घणाघात केला आहे. (PM Modi Rajya Sabha Speech) आमच्यावर हुकुमशाहीचे आरोप होत असले तरी यांच्या काळात मोठ्या प्रमाणात या पद्दतीने कारभार झाला असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या काळात कितीवेळा सरकार पाडले गेले याचा पाडाच वाचला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (कलम 356)चा दाखला देत काँग्रेसच्या काळात कितीवेळा सरकार पाडले हे सांगितले आहे. ते बोलताना म्हणाले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी (कलम 356)चा आधार घेत केरळमधील पहिले सरकार पाडले होते असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्या सभेत बोलताना केला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे तरुण मुंख्यमंत्री झालेले शरद पवार यांचेही सरकार असेच पाडले असा आरोप मोदी यांनी यावेळी केला आहे.

केरळमधील पहिले सरकार पाडले : याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसने निर्वाचित सरकारं किमान 90 वेळा (कलम 356)चा आधार घेत पाडले आहेत असा थेट आरोप यावेळी बोलताना केला आहे. या काळात आपल्या हुकुमशाही दिसली नाही असे म्हणत मोदींनी या काळात ही सराकरे व्यवस्थित चालत असतना पाडण्यात आली असेही ते म्हणाले आहेत. त्याचवेळी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कार्यकाळावरही मोदी भाषणादरम्यान बोलले आहेत. ते म्हणाले काँग्रेसने (कलम, 356)चा वापर करत जे 90 वेळा सरकार पाडले त्यामध्ये त्याचपद्धतीने इंदिरा गांधी यांनी (50)वेळा सरकार पाडले. याचवेळी पंडित नेहरूंनी केरळमधील पहिले सरकार पाडले. तामिळनाडूत मगर आणि करुणानिधी यांची सरकारे या काँग्रेसवाल्यांनी पाडली. तसेच, तत्कालीन महाराष्ट्राचे तरूण मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांचेही सरकार काँग्रेसने पाडले असही मोदी यावेळी म्हणाले आहेत.

पवारांच पहिल सरकार : शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये असताना ( 1978) मध्ये बंड केले होते. त्यावेळी त्यांनी वसंतदादा पाटील यांच्याविरोधात बंड केले. पवार 38 आमदार घेऊन बाहेर पडले. सरकारमधून बाहेर पडताना त्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे वसंतदादांकडे पाठवले होते. त्यापूर्वीच त्यांची जनता पक्षाबरोबरही बोलणी झाली होती. दरम्यान, पवारांनी बंड केल्याचे यशवंतराव चव्हाण यांना कळले, तेव्हा त्यांनी सरकार पाडण्याचा निर्णय थांबवा, असे आवाहन केले होते. परंतु, तोपर्यंत राजीनामे गेले होते. दोर कापले गेले होते. त्यानंतर वसंतदादांचे सरकार कोसळले. दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वाखाली समांतर काँग्रेसची स्थापना झाली. तसेच, राज्यात नवे सरकार आले. त्याला पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) असे नाव देण्यात आले. त्यानंतर शरद पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आणि पवार पहिल्यांदा स्वतंत्र भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले.

पवारांच सकरार कोसळल : पवारांचे महाराष्ट्रात सरकार आले तेव्हा केंद्रात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू होत्या. केंद्रात पुन्हा इंदिरा गांधी यांचे सरकार आले आणि त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे, जनता पक्षातही फूट पडली होती. त्यामुळे राजकीय समीकरणे पुन्हा अस्थिर होऊ लागली. याचवेळी महाराष्ट्रातील खासदारांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. त्याप्रमाणे (17 फेब्रुवारी 1980)रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शरद पवारांचे पुलोदचे सरकार बरखास्त केले आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली.

पवार पुन्हा काँग्रेसमध्ये : शरद पवार यांचे सरकार कोसळ्यानंतर ( 1980)ला महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये इंदिरा काँग्रेसला मोठे यश मिळाले. त्यावेळी पवारांची समाजवादी काँग्रेस पराभूत झाली. मग इंदिरा काँग्रेस सत्तेत आली आणि पुढे बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सहा वर्षं समाजवादी काँग्रेसने विरोधी पक्षाचे काम केले. त्याच काळात शरद पवारांनी (1987)ला राजीव गांधी यांच्या नेतृत्वात पुन्हा इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा : कमळ उमलण्यात विरोधकांचेही योगदान, चिखल फेकाल तर कमळच उगवेल - पंतप्रधान मोदी

Last Updated :Feb 9, 2023, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.