ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Jan 11, 2022, 6:10 AM IST

Updated : Jan 11, 2022, 6:26 AM IST

आजच्या टॉप न्यूज
आजच्या टॉप न्यूज

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

आज दिवसभरात -

  • महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी आज अखेरचा दिवस

कृषि विभागाने आता महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरीता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकरी शेती निगडीत विविध बाबींसाठी यावर अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे.

  • इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून इंडिया ओपन २०२२ ही बॅडमिंटन स्पर्धा सुरु होत आहे. नवी दिल्लीतील के. डी. जाधव इनडोअर हॉलमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. या स्पर्धेत विविध देशातील खेळाडू सहभागी होणार असून, १६ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेत एकूण ४ लाख डॉलरच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे.

  • संजय राऊत साधणार निशाणा?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश मंत्री आणि आमदार कोरोनाबाधित झाले आहेत. असे असताना विरोधकांकडून दररोज राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते कुणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे आहे.

  • शरद पवारांची पत्रकार परिषद

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच राज्यातील कोरोनाची परिस्थिती, एसटी कामगारांचा संप अशा विविध मुद्द्यांवर पवारांची नेमकी भूमिका आज समोर येणार आहे. मध्यंतरी पवारांनी स्वतः कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. लॉकडाऊन लावण्याच्या शक्यतेवर आता पवार काय भाष्य करणार हे महत्वाचे आहे.

आजचे राशीभविष्य -

काल दिवसभरात -

नागपूर - आरपीएफच्या पथकाने ( RPF squad ) नागपूर रेल्वे स्टेशनवर ( Nagpur Railway Station ) एकाला संशयावरुन पकडले, त्याच्याकडे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट ( gold biscuits ) तसेच दोन लाख 63 हजारांची रोख सापडली आहे. तो सैन्यात कार्यरत असल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली आहे. मात्र त्याने सोन्याचे बिस्कीट आणि रोख कुठून आणली या संदर्भात समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने त्याला आयकर विभागाकडे ( Income tax department ) सोपवण्यात आले आहे.

मुंबई - गोवा, उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना ( Five States Assembly Elections 2022 ) विदेशात राहणारे ५०० भारतीय नागरिक भाजपचा प्रचार करणार ( NRI Team For BJP Election Campaign ) आहेत. त्यासाठी भाजपच्या या ५०० एनआरआयची टीम सज्ज झाली असून, ते सर्व आता प्रचारात सामील होणार आहेत.

पणजी - गोव्यात विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) जवळ येत असताना भारतीय जनता पक्षात मात्र राजीनामासत्र सुरु झाले आहे. सोमवारी सकाळी राज्याचे मंत्री मायकल लोबो यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा ( Michel Lobo Resigned from Goa BJP ) दिल्यानंतर, संध्याकाळी भाजपचे दुसरे आमदार प्रवीण झांट्ये यांनी अपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांच्या सचिवाकडे जमा ( BJP MLA Pravin Zantye Resigned ) केला.

मुंबई - विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम असून गेले 70 दिवस राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा संप ( ST Workers Strike ) सुरू आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कृती समितीचे सदस्य यांची बैठक ( meeting on st workers strike mumbai ) बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतायला हवं असे आवाहन ( Sharad Pawar appeal to ST employees ) केले.

मुंबई- सांताक्रुझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक थरारक घटना घडली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या विमानाजवळच पुशबॅक वाहनाने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, विामतळावरील सुरक्षा रक्षकांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.

Last Updated :Jan 11, 2022, 6:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.