ETV Bharat / state

Arrested with Gold Biscuits : नागपूर रेल्वे स्थानकातून सोन्याच्या बिस्कीटासह एकाला अटक

author img

By

Published : Jan 10, 2022, 11:57 AM IST

आरपीएफच्या पथकाने ( RPF squad ) नागपूर रेल्वे स्टेशनवर ( Nagpur Railway Station ) एकाला संशयावरुन पकडले, त्याच्याकडे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट ( gold biscuits ) तसेच दोन लाख 63 हजारांची रोख सापडली आहे. तो सैन्यात कार्यरत असल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली आहे. मात्र त्याने सोन्याचे बिस्कीट आणि रोख कुठून आणली या संदर्भात समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने त्याला आयकर विभागाकडे ( Income tax department ) सोपवण्यात आले आहे.

Arrested with Gold Biscuits
सोन्याच्या बिस्कीटासह एकाला अटक

नागपूर: आरपीएफ पथकाला मिळालेल्या माहिती नुसार ट्रेन नंबर 20805 विशाखापट्नम नवी दिल्ली एक्सप्रेसमध्ये एक संशयास्पद व्यक्ती गाडीतून प्रावस करत आहे. त्याच्या आधारे प्रभारी निरीक्षक आर एल मीना यांनी कर्मचारी नियुक्त केले. संबंधित व्यक्ती खाली उतरताच पथकाने त्याची चौकशी केली, तेव्हा तो उडवा-उडवीचे उत्तर देत होता त्याची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट तसेच दोन लाख 63 हजारांची रोख सापडली. संपूर्ण सगळ्याची किंमत 7 लाख 63 हजार रुपये इतकी आहे.
तो सांगतोय मी सैन्यात आहे
आरपीएफला मिळालेल्या सुचनेनुसार एक लाल ट्रॉली बॅग घेऊन एक व्यक्ती नागपुर रेल्वे स्टेशनवर उतरणार आहे. त्याच्या बॅग मध्ये संशयास्पद ऐवज असण्याची शक्यता आहे. या माहितीच्या आधारे पथकाने त्याची चौकशी केली तेव्हा त्याने तो सैन्यात आहे असे सांगितले, तो चौकशीत सहकार्य करत नसल्याने त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. तेव्हा बॅग मध्ये 100 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या बिस्कीटासह दोन लाख 63 हजारांची रोख सापडली. या संदर्भात तो समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने त्याला पूर्ण मुद्देमालासह आयकर विभागाकडे सोपवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.