ETV Bharat / bharat

The UPSC aspirant girl died : बॉयफ्रेंडला भेटण्याची अगतिकता भोवली, युपीएससीची तयारी करण्याऱ्या युवतीचा अंत

author img

By

Published : Jun 11, 2022, 12:44 PM IST

Girl Fell From Third Floor
युपीएससीची तयारी करण्याऱ्या युवतीचा अंत

तिसऱ्या मजल्यावरून पडून युवतीचा करूण अंत झाला. चेन्नईतील नमक्कल येथे राहणारी ही युवती युपीएससी परीक्षेची ( Upsc Exam ) तयारी करीत होती. घरी आल्यावर दरवाजा बंद असल्याने तिने तिसऱ्या मजल्यावरून बाल्कनीतून साडीच्या साह्याने उतरत घरात जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान साडी फाटल्याने ती खाली पडून ( Fell From Third Floor )तिचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा तिचा प्रियकर ( Boy Friend ) आतमध्ये खोलीत झोपलेला होता.

Intro:Body:

चेन्नई - तिसऱ्या मजल्यावरून पडून युवतीचा करूण अंत झाला. चेन्नईतील नमक्कल येथे राहणारी ही युवती युपीएससी परीक्षेची ( Upsc Exam ) तयारी करीत होती. घरी आल्यावर दरवाजा बंद असल्याने तिने तिसऱ्या मजल्यावरून बाल्कनीतून साडीच्या साह्याने उतरत घरात जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान साडी फाटल्याने ती खाली पडून ( Fell From Third Floor )तिचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा तिचा प्रियकर ( Boy Friend ) आतमध्ये खोलीत झोपलेला होता.

शुक्रवारी तिचा मित्र राजकुमार मखिलमतीच्या घरी थांबला होता. मखिलमती सायंकाळी घरी आली तेव्हा तिच्या घराला कुलूप होते. मखिलमतीने तिच्या मित्राला मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तो उचलला नाही. अखेर तिने मागच्या दाराने घरात जाण्याचा विचार केला. तिसऱ्या मजल्यवरील बाल्कनीतून साडीच्या साह्याने तिने उतण्याचा प्रयत्न केला. साडीचा दोरीप्रमाणे वापर करीत ती उतरत होती, परंतु अचानक साडी फाटली. साडी फाटल्यामुळे ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला. जामबाजार पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून राजपेट शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केला आहे.

राजकुमार हा अद्यार येथे राहत असून तो सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून एका आयटी कंपनीत नोकरीस आहे. मखिलमतीला आपल्या गावाला जायचे होते. त्यामुळे तिने राजकुमारला मला बसस्टँडला सोड असे सांगितले होते. मात्र, ती जेव्हा घरी आली तेव्हा तो थकवा आल्याने झोपला होता. झोप लागल्यामुळे आपल्याला दरवाजा वाजविल्याचा आवाज आला नाही, असे त्याने सांगितले.

हेही वाचा - Anil Desai : भाजपसोबत कोण, कसे गेले, हे पडताळून पाहिले.. पक्ष त्यावर विचार करणार - अनिल देसाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.