ETV Bharat / bharat

Chess Olympiad: पंतप्रधानांनी केले 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालचे उद्घाटन

author img

By

Published : Jun 19, 2022, 7:09 PM IST

Updated : Jun 19, 2022, 8:21 PM IST

पंतप्रधानांनी केले 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालचे उद्घाटन
पंतप्रधानांनी केले 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्धिबळ ऑलिम्पियाडची टॉर्च रिलेचा शुभारंभ केला. यावेळी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हेही उपस्थित होते. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना पंतप्रधानांनी यावेळई शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्ली - इंदिरा गांधी स्टेडियमवर (44)व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडची टॉर्च रिले सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रिलेचा शुभारंभ केला. यावेळी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हेही उपस्थित होते. बुद्धिबळ ऑलिम्पियाडपूर्वी टॉर्च रिलेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 43 बुद्धिबळ ऑलिम्पियाड झाले आहेत. परंतु. आतापर्यंत टॉर्च रिलेचे आयोजन करण्यात आले नव्हते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये १८८ देशांतील दोन हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत महाबलीपुरम येथे होणार आहे. यामध्ये 187 देशांतील विक्रमी 343 संघ खुल्या व महिला गटात सहभागी होणार आहेत. दरम्यान, ही मशाल रिले केवळ भारतासाठीच नव्हे, तर खेळाच्या गौरवशाली वारशासाठी देखील आहे," असे पंतप्रधान मोदी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. बुद्धिबळ हा खेळ आपल्या जन्मस्थानी एक मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम म्हणून साजरा केला जात आहे आणि आता जगभरातील लोकांसाठी हा खेळ आवडला आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

मोदी म्हणाले की, गेल्या आठ वर्षांत भारताने बुद्धिबळात आपली कामगिरी सुधारली आहे आणि न्यू इंडियाचे तरुण प्रत्येक खेळात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि विक्रम करत आहेत. "आता आम्ही 2024 पॅरिस ऑलिम्पिक आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवून काम करत आहोत आणि त्यासाठी खेळाडूंना (TOPS)द्वारे देखील पाठिंबा दिला जात आहे असही ते म्हणाले आहेत.

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. यावर्षी, प्रथमच, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संस्था, (FIDE)ने बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालची स्थापना केली आहे जी ऑलिंपिक परंपरेचा भाग आहे. परंतु, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कधीही केली गेली नाही. बुद्धिबळ ऑलिम्पियाड टॉर्च रिले घेणारा भारत हा पहिलाच देश असेल.

हेही वाचा - Father's Day: मुलींसाठी झटणारा बाप! मध्य प्रदेश क्रीडा अकादमीत दोघींना मिळाला प्रवेश

Last Updated :Jun 19, 2022, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.