ETV Bharat / bharat

Naresh Jat: आर्मी नरेश याने स्वतःवर गोळी झाडत संपवले जीवन; राजस्थानमधील घटना

author img

By

Published : Jul 11, 2022, 10:49 PM IST

आर्मी नरेश जाट
आर्मी नरेश जाट

जोधपूर येथील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात जवान नरेश जाट याने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवले. ( Naresh Jat ) नरेश जाट याने पत्नी आणि मुलीसह स्वत:ला 18 तासांपासून ओलीस ठेवले होते.

जोधपुर (राजस्थान) - सीआरपीएफ जवान नरेश जाट याने अखेर स्वत:वर गोळी झाडली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजल्यानंतर तत्काळ सीआरपीएफचे आयजी विक्रम सहगल त्याच्यासोबत बोलण्यासाठी जोधपूरला पोहोचले होते. त्याची सहगल यांच्याशी फोनवर बोलने झाले होते. ( CRPF Jawan Took Himself Hostage ) दरम्यान, त्याने आपल्या वडिलांना भेटण्यासाठी बोलावले होते. परंतु, कॉर्टरवर त्याला थांबवले त्याचदरम्यान त्याने स्वत:ला गोळी मारली त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

माहिती देताना पोलीस अधिकारी

नरेशची पत्नी आणि मुलगी सुखरूप आहेत - या घटने अगोदर सहगल याची समजूत काढण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू होते. अशी माहिती पोलीस आयुक्त रविदत्त गौर यांनी दिली. त्याच्या पत्नीनेही त्याला समजावून सांगितले आणि नोकरी गेली तर शेती करू असही ती सांगत होती. ( The army Naresh ended his life by shooting himself ) वडील, भाऊ आणि इतरही सतत समजावून सांगत होते. मात्र, त्याने कुणाचेही ऐकले नाही. त्यांना नक्की कशाची आणि काय अडच झाली हा विषय सध्यातरी ठोसपणे समोर आलेला नाही अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान, नरेशची पत्नी आणि मुलगी सुखरूप आहेत असही त्यांनी सांगितले आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

साडेआठपर्यंत त्याने आठ फायर केले होते - मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी नरेशचे सहकारी कॉन्स्टेबलसोबत भांडण झाले. यादरम्यान साथीदाराने त्याच्या हाताला चावा घेतला. त्याबाबत तक्रार करण्यासाठी डीआयजीकडे गेला. मात्र, उलट त्यांना शिवीगाळ करून तुम्ही बदमाश असल्याचे सांगितले. त्यांनी रजाही मागितली होती. मात्र, तीही त्यांना नाकारण्यात आली होती, असे सांगण्यात येत आहे. यानंतर त्याने रागाच्या भरात आपल्या क्वार्टरमध्ये जाऊन कुटुंबासह स्वत:ला बंधक बनवून घेतले. यानंतर त्याने पाच वाजता पहिला गोळीबार केला, त्यानंतर संपूर्ण प्रशिक्षण केंद्रात खळबळ उडाली. साडेआठपर्यंत त्यांनी आठ फायर केले होते.

समोरासमोर बोलण्यापूर्वीच त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली - याबाबत माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि समजावण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकारी रात्रभर समजावत राहिले, फोनवर बोलले आणि त्याच्या कुटुंबीयांनाही बोलावले. यानंतर रात्री उशिरा सहगल यांनी फोन बंद केला. सकाळी त्यांनी आयजीशी बोलण्यास सांगितले. याची माहिती मिळताच आयजी विक्रम सहगल जयपूरहून जोधपूरला पोहोचले, पण समोरासमोर बोलण्यापूर्वीच त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली.

नोकरी गेली तर शेती करू - सीआरपीएफ जवान नरेश जाट हे त्यांच्या गणवेशाच्या प्रेमात पडले होते. सोमवारी स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी त्याने पूर्ण गणवेश परिधान केला होता. त्याने इन्सास रायफल हनुवटीच्या खाली ठेवली आणि गोळीबार केला. यामुळे गोळी त्यांच्या डोक्याला लागली. तो हे करत असताना त्याची पत्नी आणि मुलगी तिथेच होती. बायको म्हणत राहिली की नोकरी गेली तर शेती करू पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. पत्नीला माझ्या जवळ येऊ नकोस असे सांगत राहीला.

हेही वाचा - Waterfall In Karnataka: पाहा कर्नाटकात असणारा भारतातील सर्वांत उंच धबधबा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.