संशयित दहशतवादी ओसामाने पाकिस्तानात घेतले 15 दिवस प्रशिक्षण; बापासह काकानेही केली मदत

author img

By

Published : Sep 16, 2021, 12:24 PM IST

दहशतवादी ओसामाने पाकिस्तानात घेतले 15 दिवस प्रशिक्षण

अटक केलेले ओसामा आणि जिशान हे 15 दिवसांसाठी पाकिस्तानात गेले होते, तिथे त्यांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना शस्त्रे वापरण्याचे तसेच स्फोट घडवून आण्यासाठी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर दोघे एप्रिलमध्ये भारतात परतले होते. या प्रशिक्षणासाठी ओसामाला त्याच्या कुटुंबीयांनीच मदत केल्याची माहिती पुढे आली आहे.

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जामियानगरमधून अटक केलेला संशयित दहशतवादी ओसामाच्या घरातील सदस्यांची भूमिका देखील संशयास्पद आहे. पोलिसांच्या चौकशीत हे समोर आले आहे की, ओसामाला पाकिस्तानात जाऊन दहशती कारवायांचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्याचे वडील आणि त्याच्या काकानेही मदत केली होती. यासाठी या दोघांनी ओसामाला जवळपास तीन लाख रुपये दिले होते. ओसामाच्या मोबाईलमधून शंकास्पद चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले आहे. या सर्व शक्यता लक्षात घेतच पोलिसांनी ओसामाची चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पेशल सेलने मंगळवारी दिल्ली, राजस्थान आणि यूपीमधून सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. यामध्ये दिल्लीच्या जामिया नगरचा रहिवासी ओसामाचा समावेश आहे. अटक केलेले ओसामा आणि जिशान हे 15 दिवसांसाठी पाकिस्तानात गेले होते, तिथे त्यांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना शस्त्रे वापरण्याचे तसेच स्फोट घडवून आण्यासाठी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर दोघे एप्रिलमध्ये भारतात परतले होते.

ओसामाचे वडील दुबईत मदरसा चालवतात-

ओसामाचे वडील आणि काकांची भूमिकाही पोलिसांना संशयास्पद वाटली आहे. चौकशी दरम्यान, पोलिसांच्या टीमला माहिती मिळाली आहे, की ओसामाच्या पासपोर्टमध्ये ओमान जाण्यापर्यंतची कागदपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, पुढील कोणत्याही कागदपत्रांचा उल्लेख करण्यात आला नाही. ओसामाचे वडील दुबईत राहतात आणि या दहशतवादी प्रशिक्षणासाठी त्यांनी आपल्या मुलाचा संपूर्ण खर्च उचलला होता. त्यांच्या काकांनीही या कामात मदत केली. ओसामाचे वडील दुबईमध्ये मदरसा चालवतात. पोलीस आता त्याचे वडील आणि काकांच्या या प्रकरणातील भूमिकेचा तपास करत आहेत.

मूलचंद उर्फ ​​लाला हा कुख्यात शूटर-

चौकशी दरम्यान, पोलिसांना समजले आहे की, अटक केलेला मूलचंद उर्फ ​​लाला हा कुख्यात शूटर आहे, जो सुपारी घेऊन हत्या करतो. दुसरीकडे, संशयित दहशतवादी जान मोहम्मद उर्फ ​​समीर महाराष्ट्रातील खंडणीचे काम हाताळतो. यापूर्वी त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा तपशीलांचा पोलीस तपास करत आहेत. पोलीस आता त्याचा दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमशी असलेल्या संबंधांची माहिती गोळा करण्यात गुंतले आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. यूपी पोलिसांनी 3 जणांना पकडले, त्यापैकी दोन जणांना स्पेशल सेलने चौकशीनंतर सोडले आहे. तर तिसरा व्यक्ती सापडला नाही. अटक केलेले सर्व आरोपी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्याकडून संपूर्ण षडयंत्राबाबत चौकशी केली जात आहे.

हेही वाचा - सणासुदीतील बॉम्बस्फोटाचा उधळला डाव; 6 दहशतवाद्यांना दिल्लीत अटक

हेही वाचा - मुंबईत येथे राहातो संशयित दहशतवादी, शेजाऱ्यांचा बोलण्यास नकार

हेही वाचा - मुंबईत दहशतवादी पकडले जाणे म्हणजे राज्याच्या सुरक्षेसाठी धोक्याची घंटा - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.