ETV Bharat / bharat

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 5:15 PM IST

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली आहे. त्यामुळं मराठा समाजाला मोठा दिलासा दिला मिळाला आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation

नवी दिल्ली Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारसह इतरांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली आहे. त्यामुळं मराठा समाजाला मोठा दिलासा मिळला आहे. याबाबत माहिती देताना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयानं आज क्युरेटिव्ह याचिकेवर भाष्य केलं आहे. सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा क्युरेटिव्ह याचिकेवर 24 जानेवारी 2024 रोजी सुनावणी ठेवली आहे. त्यामुळं त्यावर लवकरात लवकर सुनावणी होऊन मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल, असा विश्वास विनोद पाटील यांनी व्यक्त केला.

क्युरेटिव्ह पिटिशन न्यायालयानं स्वीकारली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्टात काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली होती. या वेळी राज्य सरकारनं सुनावणीवेळी आपली भूमिका मांडली. त्यामुळं सर्वोच्च न्यायालय लवकरच या प्रकरणावर निकाल देईल, अशी अपेक्षा होती. ज्यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली जाणार की नाही, याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अखेर आज न्यायालयानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळं मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे.

खुल्या न्यायालयात सुनावणीची शक्यता : सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्यानं मराठा आरक्षणाबाबत समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच मराठा आरक्षण याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळं राज्य सरकारलाही तात्पुरता दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता 24 जानेवारीला होणाऱ्या पुढील सुनावणीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. मराठा आरक्षण आंदोलन : मनोज जरांगेंची आज शेवटची इशारा सभा, काय घेणार निर्णय, याकडं नागरिकांचं लक्ष
  2. मनोज जरांगे यांचं बीडमध्ये जंगी स्वागत, 201 जेसीबीमधून फुलांची उधळण
  3. तुरुंगात जाईन पण माफी मागणार नाही; सुषमा अंधारेंचं नीलम गोऱ्हेंना संस्कृतमधून पत्र
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.