Trichy Bypass Accident : लॉरी आणि ओम्नी व्हॅनच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू

author img

By

Published : Mar 19, 2023, 10:17 AM IST

Trichy Bypass Accident
त्रिची बायपासजवळ अपघात ()

तामिळनाडूच्या त्रिची - सालेम राष्ट्रीय महामार्गावर एक लॉरी आणि ओम्नी व्हॅनची धडक होऊन एक लहान मूल आणि एका महिलेसह 6 जण जागीच ठार झाले. आज पहाटे 3.50 वाजता ही घटना घडली.

त्रिची (तामिळनाडू) : लॉरी आणि ओम्नी व्हॅन यांच्यात झालेल्या धडकेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना तामिळनाडूच्या त्रिची बायपासजवळ घडली आहे. एका लहान मुलासह 9 जण एका ओम्नी व्हॅनमधून सालेम जिल्ह्यातील इडाप्पाडी येथून त्रिची मार्गे कुंभकोणम मंदिराकडे जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका लॉरीने व्हॅनला धडक दिली.

जखमी अतिदक्षता विभागात दाखल : पहाटे 3.50 वाजता त्रिची जिल्ह्यातील टोल गेटच्या शेजारी तिरुवासीजवळ, एडप्पाडीहून येणारी एक ओम्नी व्हॅन आणि समोरुन येणाऱ्या लॉरीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ओम्नी व्हॅनमधील एक बालक, एक महिला आणि चार पुरुषांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वाटाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेतील ३ जणांची सुटका करून त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. जखमींना अतिदक्षता विभागात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, पोलिसांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदन तपासणीसाठी त्रिची सरकारी सामान्य रुग्णालयात पाठवले आहेत.

महामार्गावर वाहतूक विस्कळीत : जिल्हा पोलीस अधीक्षक सुजित कुमार यांनी अपघातस्थळी भेट देऊन पोलिसांकाडून अपघाताची माहिती घेतली. या अपघातामुळे त्रिची - सालेम राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली असून सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला आणून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम पोलिस कर्मचारी करत आहेत.

नागरिकांची रस्ता रुंदीकरणाची मागणी : त्रिची ते मुसिरी हा ५० किमी अंतराचा रस्ता अतिशय अरुंद आहे. अलीकडच्या काळात या भागात वारंवार अपघात होऊन जीवितहानी होते आहे. त्यामुळे या रस्त्यावरील धोकादायक वळणांवर स्पीड बंप व लोखंडी बॅरिकेड्स उभे करून तसेच रस्ता परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा : Awantipora Accident : जम्मू काश्मीरमध्ये अपघातात चार प्रवासी मजूर ठार, अनेक जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.