ETV Bharat / bharat

'सॅम बहादुर' यांनी शिक्षण घेतलेली शाळा बंद होण्याच्या मार्गावर, सुपुत्राच्या आठवणी जतन करण्याची नागरिकांची मागणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 8:27 AM IST

Sam Bahadur
संपादित छायाचित्र

Sam Bahadur : पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मात्र फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी पाया रचलेल्या शाळेला बंद करण्याचा घाट प्रशासनानं घातला आहे. त्यामुळे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या आठवणी पुसण्याचं काम सुरू असल्याची नागरिकांकडून टीका केली जात आहे.

'सॅम बहादुर यांच्या आठवणी नामशेष होण्याच्या मार्गावर

देहरादून Sam Bahadur : देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम मानकशॉ यांच्या जीवनावर आधारित असलेलाल 'सॅम बहादुर' या चित्रपटाला आता प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. तरुणांना त्यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटातून पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्याविषयी बरीच माहिती मिळत आहे. दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी हा चित्रपट दिग्दर्शीत केला आहे. मात्र देशभरात चित्रपटाला यश मिळत असताना देहरादूनमध्ये असलेल्या फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या आठवणी पुसण्याचं काम करण्यात येत आहे. देहरादूनमध्ये त्यांच्या नावानं असलेलं 58 जीटीसी म्हणजेच देहरादून गोरखा ट्रेनिंग सेंटर कनिष्ठ महाविद्यालय ही शाळा बंद करण्याची आता फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. या शाळेची स्थापना 11 ऑक्टोबर 1966 ला झाली होती.

फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी रचला होता पाया : या शाळेचा पाया पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी रचला होता. भारतीय सैन्य दलातील सैनिकांच्या मुलांना या शाळेत शिक्षण दिलं जात होतं. याशिवाय त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनीही आपल्या मुलांना या शाळेत दाखल केलं होतं. मात्र या शाळेत एकेकाळी एक हजारापेक्षा जास्त मुलं शिक्षण घेत होती. आता केवळ 50 मुलं या शाळेत शिकत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ही शाळा बंद करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न : फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी पााया रचलेल्या या शाळेला बंद करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. शाळेच्या इमारतीच्या दुरावस्थेबाबत कँट बोर्डाकडून प्रशासनाला पत्रं लिहिली जात आहेत. मात्र त्याला प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. इमारत जीर्ण झाल्यानं या शाळेत विद्यार्थी संख्याही वाढवता येत नाही. त्यामुळे शाळा बंद करण्यासाठी वारंवार पत्रं लिहिली जात आहेत.

पहिल्या फिल्ड मार्शलच्या आठवणी नष्ट करू नये : भारतीय सैन्य दलाच्या मालकीची ही शाळा 1952 साली सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ही शाळा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी उद्घाटन केलेल्या इमारतीत हलवण्यात आली. मात्र ही शाळा आठवीपर्यंत असून ती बंद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शाळेच्या कर्मचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. आपलं संपुर्ण आयुष्य या शाळेत दिलं, ती बंद झाल्याची माहिती मिळणं हे अत्यंत वेदनादायी आहे. देशाच्या पहिल्या फिल्ड मार्शल असलेल्या सॅम माणेकशॉ यांच्या आठवणी पुसल्या जाऊ नयेत, अशी इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया या शाळेचे प्राचार्य अनिल कुमार यांनी दिली. ही शाळा अनुदानित असून उत्तराखंड सरकार या शाळेतीस कर्मचाऱ्यांना पगार देते. इतकंच नाही, तर भारतीय सैन्य दलातील जवानांना फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या शौर्याच्या कथा आणि पुस्तकं वाचण्यासाठी दिले जातात. मात्र शाळेच्या खर्चाचं अंदाजपत्रक वेळोवेळी देण्यात येऊनही आर्थिक मदत का पाठवण्यात आली नाही, हे अद्याप कोणालाही माहिती नाही. मात्र भारत मातेच्या या शूर सुपुत्राच्या आठवणी अशा पुसल्या जाऊ नये, असं नागरिकांना वाटते.

हेही वाचा :

Sam Bahadur : विकी कौशलनं हुबेहुब साकारले सॅम माणेकशॉ , उलगडला भारतीय सैन्याचा वैभवशाली इतिहास

सैनिकांना प्रेरणा देणाऱ्या 'सॅम बहादूर' चित्रपटातील 'बंदा' गाणं लॉन्च

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.