ETV Bharat / bharat

योगी सरकारविरोधात प्रियंका गांधींसह भाजपचे खासदार वरुण गांधींचे आव्हान, गांधी परिवाराची होणार एकजूट?

author img

By

Published : Nov 1, 2021, 7:56 PM IST

priyanka gandhi
priyanka gandhi

वरुण गांधी यांनी पूर्वीची नाराजी व तक्रारी विसरून घरात परत यावे, अशी प्रियंका गांधी यांची इच्छा असल्याचे गांधी परिवाराचे स्नेही सांगतात. वरुण गांधी हे पुन्हा कुटुंबात वापस आल्यास काँग्रेस पक्ष मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसमध्ये सध्या चांगली स्थिती नाही. कारण, काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीवरून मतभेद समोर आले होते.

लखनौ - लखीमपूर खेरी हिंसक आंदोलनावरून (Lakhimpur Kheri violence) योगी सरकारवर पीलभीत मतदारसंघाचे भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी निशाणा साधला. त्यानंतरही खासदार वरुण हे सातत्याने योगी सरकारच्या (Yogi government of UP) शेतकरी धोरणाविरोधात टीका करत आहेत. अशातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) यांचा वरुण गांधी यांच्याबद्दलचा स्नेह वाढला आहे. प्रियंका गांधी हे संपूर्ण कुटुंबाला एक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

वरुण गांधी यांनी पूर्वीची नाराजी व तक्रारी विसरून घरात परत यावे, अशी प्रियंका गांधी यांची इच्छा असल्याचे गांधी परिवाराचे स्नेही सांगतात. वरुण गांधी हे पुन्हा कुटुंबात वापस आल्यास काँग्रेस पक्ष मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसमध्ये सध्या चांगली स्थिती नाही. कारण, काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीवरून मतभेद समोर आले होते.

प्रियंका गांधी वड्रा
प्रियंका गांधी वड्रा

हेही वाचा-काँग्रेस आणि भाजप दोन्ही भ्रष्ट- अरविंद केजरीवाल यांची टीका

दोन्ही गांधींचे योगी सरकारला आव्हान-

शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या बाजार समितीच्या अधिकाऱ्यांबाबत खासदार वरुण गांधी यांनी नाराजी व्यक्त केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये वरुण गांधी म्हणतात, आता सरकारपुढे हात जोडून विनंती करणार नाही. थेट न्यायालायत खेचणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपला गांधी परिवाराकडून दुहेरी आव्हान आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांनी आक्रमक प्रचार करत महिलांना 40 टक्के संधी देण्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपसमोर आव्हान उभे निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे वरुण गांधी हे नियोजनबद्धपणे भाजपवर निशाणा साधत आहेत.

योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ

काँग्रेस प्रवक्त्यांकडून वरुण गांधी यांचे कौतुक

  • राहुल गांधी व वरुण गांधी हे गांधी परिवाराचे वारस आहेत. त्यांची परत एकजुट करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे सुत्राने सांगितले. काँग्रेसचे प्रवक्ते वृत्तवाहिन्यांमध्ये वरुण गांधी यांची मनमोकळेपणाने कौतुक करत आहेत. हे पाहता काँग्रेसकडून वरुण गांधी यांची घरवापसी होण्याकरिता प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहेत.
  • काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेरा म्हणाले, की वरुण गांधी यांच्याजवळ आत्मा आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या हक्काबाबत बोलत आहेत. दुसरीकडे भाजप नेत्यांजवळ आत्मा नाही. दुसऱ्या प्रवक्त्यानेही ट्विटरवर वरुण गांधी यांचे कौतुक केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मोदी आणि शाह यांना कोणतेही गांधी सहन होत नाहीत. त्यांच्या पक्षात असले तरीही!
  • प्रियंका गांधी यांचे सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम हे सतत वरुण गांधी यांचे कौतुक करतात. त्यांनी नुकतेच ट्विटमध्ये म्हटले, की गांधी असेच करू शकतात. वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या ट्विटचे आचार्य कृष्णम यांनी स्वागत केले आहे. काही काँग्रेस नेत्यांनी फोन करून वरुण गांधी यांचे अभिनंदन केले.
    वरुण गांधी
    वरुण गांधी

हेही वाचा-युपीची आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नाही- अखिलेश यादव

...तर शाह-मोदी यांचा इंदिरा गांधी यांच्या वारसदारांशी संघर्ष

शेतकऱ्यांची बाजू मांडल्याने राहुल, प्रियंका यांच्यानंतर वरुण गांधी यांची लोकप्रियता वाढली आहे. वरुण गांधी हे भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत. तसे घडले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना इंदिरा गांधी यांच्या वारसदारांशी राजकीय संघर्ष करावा लागेल. मात्र, त्वरित निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. गांधी परिवाराच्या जवळचे व्यक्ती हे संपूर्ण गांधी परिवाराची एकजूट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा-गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणात 4 जणांना फाशीची शिक्षा, दोघांना जन्मठेप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.