ETV Bharat / bharat

Online Gaming Conversion Case : शाहनवाजवर लागू शकतो NSA, पाकिस्तानात केले होते 350 कॉल!

author img

By

Published : Jun 14, 2023, 9:46 PM IST

Online Gaming Conversion Case
ऑनलाइन गेमिंग धर्मांतर प्रकरण

ऑनलाइन धर्मांतराचा मास्टरमाइंड शाहनवाजचे पाकिस्तानशी असलेले कनेक्शन समोर आले आहे. त्याला पाकिस्तानातून काही ई-मेल आल्याची माहिती मिळाली आहे. यासोबतच त्याच्याकडून काही पाकिस्तानी क्रमांक मिळाले आहेत. ज्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच NSA लागू केला जाऊ शकतो.

नवी दिल्ली/गाझियाबाद : मुंबईतून अटक करण्यात आलेल्या ऑनलाइन धर्मांतर प्रकरणाचा मुख्य सूत्रधार 'शाहनवाज' उर्फ '​​बद्दो'वर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच NSA लागू करण्याची तयारी करण्यात आली आहे. तपासात त्याचे पाकिस्तानशी संबंध आढळून आले आहेत. त्याला पाकिस्तानकडून काही ई-मेल आल्याची माहिती मिळाली आहे. यासोबतच त्याच्या फोनमध्ये पाकिस्तानमधील जवळपास 30 नंबर सेव्ह केलेले आढळले आहेत. या संदर्भात आणखी तपास करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहनवाजने पाकिस्तानमध्ये सुमारे 350 कॉल केले होते.

शाहनवाजवर NSA लागू केला जाईल : डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, आरोपी शाहनवाजकडून जप्त केलेल्या सीपीयू आणि मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. पुरेसे पुरावे आढळल्यास त्याच्यावर NSA अंतर्गत कारवाई केली जाईल. त्याच्या लॅपटॉपमध्ये काही ई-मेल आयडी सापडले आहेत, जे पाकिस्तानशी संबंधित असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तो पाकिस्तानातील जवळपास 30 नंबरवर 350 वेळा बोलला. याशिवाय त्याच्या गॅजेट्समध्ये जेवढे ई-मेल आयडी सापडले, त्यापैकी अनेक लिंक पाकिस्तानशी शेअर केल्याचे आढळून आले आहे. मात्र, त्याने मोबाईलमधील बहुतांश डेटा डिलीट केला आहे. याशिवाय कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये असलेला डेटाही डिलीट करण्यात आला आहे.

शाहनवाज करत राहिला पोलिसांची दिशाभूल : सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिलीट केलेला डेटा सायबर सेलने रिकव्हर केला असून, त्याद्वारे ही माहिती मिळवली आहे. त्याला धर्मांतराशी संबंधित प्रश्न विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याने कोणाचेही धर्मांतर केले नसल्याचे म्हटले. त्याला पाकिस्तानी मोबाईल नंबर्सबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, गुगलशी सिंक केल्यानंतर ते नंबर त्याच्या मोबाईलमध्ये आले असावेत. त्याला यापेक्षा जास्त काही कळत नाही. त्याला पाकिस्तानमधून चालणाऱ्या यूट्यूब चॅनलबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्याने सांगितले की, जो कोणी त्याला व्हिडिओ लिंक मागितला, तो त्याच्यासोबत शेअर करायचा. पोलिसांना काही यूट्यूब चॅनेलची माहिती मिळाली होती ज्यावर आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड केले जातात आणि हे यूट्यूब चॅनल पाकिस्तानशी संबंधित आहे.

शाहनवाजला काय शिक्षा होईल?, जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया : प्रसिद्ध वकील बलबीर सिंह म्हणाले की, पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये हे धर्मांतराचे प्रकरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर चर्चा होणे बाकी आहे. तपासात वेगवेगळे पीडित पुढे येऊ शकतात. तपासानंतर कलमे लावली जाणार की नाही, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या कायदेशीरदृष्ट्या असे म्हणता येईल की शाहनवाजला 1 वर्ष ते 10 वर्षे शिक्षा होऊ शकते. हे सर्व न्यायालयावर अवलंबून आहे. या प्रकरणात कलमे वाढल्यास शिक्षेतही वाढ होऊ शकते. उदाहरणार्थ, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत या प्रकरणी कारवाई केली, तर ही बाब अधिक गंभीर बनते.

हेही वाचा :

  1. Online Gaming conversion case: गाझियाबाद धर्मांतरणाचे जुडले पाकिस्तानशी तार, आरोपी शाहनवाज नेहमी होता संपर्कात
  2. मुंब्रा पोलिसांचा तपास बंद, ४०० लोकांचे धर्मांतर वास्तव की अफवा, शाहनवाजचे कुटुंबीय अज्ञात स्थळी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.