ETV Bharat / bharat

PM Narendra Modi in Jharkhand : बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान झारखंड दौऱ्यावर; झारखंडसह देशाला समर्पित करणार 'हे' प्रकल्प

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 10:33 AM IST

PM Narendra Modi in Jharkhand
PM Narendra Modi in Jharkhand

PM Narendra Modi in Jharkhand : झारखंडची राजधानी रांचीमध्ये मंगळवारी रात्री पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान आज भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं जन्मस्थान उलिहाटू इथं आदिवासी गौरव दिन साजरा करणार आहेत.

रांची PM Narendra Modi in Jharkhand : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त रांची येथील बिरसा मुंडा संग्रहालयात पोहोचून आदरांजली वाहिली. यावेळी ते भगवान बिरसा यांना कैद करण्यात आलेल्या चार क्रमांकाच्या बॅरेकमध्ये गेले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडाही उपस्थित होते.

झारखंडच्या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान आदिवासी समूहाला 24,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची भेट देणार आहेत. तर झारखंडला 7200 कोटी रुपयांच्या योजना मिळणार आहेत. बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान उलिहाटू येथे जाऊन त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारे नरेंद्र मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान असतील. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी राजधानी रांचीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय.

  • #WATCH | Jharkhand: Prime Minister Narendra Modi visits Bhagwan Birsa Munda Memorial Park cum Freedom Fighter Museum in Ranchi.

    Jharkhand Chief Minister Hemant Soren along with Union Minister of Tribal Affairs Arjun Munda and Governor of Jharkhand CP Radhakrishnan also present… pic.twitter.com/ESLqjtzPdd

    — ANI (@ANI) November 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भगवान बिरसा मुंडा यांची जयंती करणार साजरी : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 'आदिवासी गौरव दिना'च्या निमित्तानं पंतप्रधान मोदी झारखंड राज्य आणि राष्ट्राला अनेक योजना भेट देणार आहेत. पंतप्रधान पीएम पीव्हीटीजी मिशन म्हणजेच पंतप्रधान असुरक्षित आदिवासी समूह मिशन लाँच करतील. या मिशनवर 24 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 22,544 गावांमध्ये 28 लाख लोकसंख्येसह 75 पीव्हीटीजी आहेत. या अभियानाच्या माध्यमातून मूलभूत सुविधांशी संबंधित सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. याशिवाय पीएम किसान सन्मान निधीच्या 15 व्या हप्त्याअंतर्गत 18 हजार कोटी रुपये जारी करतील. या दरम्यान पूर्णाडीह कोळसा हाताळणी प्रकल्प, आयआयटी रांचीचा कायमस्वरूपी परिसर महागमा-हंसडीहा चौपदरीकरण आणि बासुकीनाथ-देवघर विभागाच्या चौपदरीकरणाची पायाभरणीही करणार आहेत.

पंतप्रधान देशाला समर्पित करणार अनेक प्रकल्प : पायाभरणी समारंभानंतर, पंतप्रधान मोदी देशाला आयआयएम रांचीचे स्थायी परिसर, आयआयटी, आयएसएम धनबादचं एक्वामेरीन विद्यार्थी वसतिगृह, हटिया-पाकडा विभागीय रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, जरंगडीह-पतरतुचे दुहेरीकरण देशाला समर्पित करतील. तलगोरिया- बोकारो रेल्वे लाईनच्या दुहेरीकरण योजनेचं उद्घाटन करणार. झारखंड राज्यात रेल्वे नेटवर्कचं 100 टक्के विद्युतीकरण झालंय. पंतप्रधान ही योजना देशाला समर्पित करतील.

हेही वाचा :

  1. Grammy award 2024 : पंतप्रधान मोदी झळकलेल्या 'अबंडन्स इन मिलेट्स' गाण्याला ग्रॅमी पुरस्कार 2024 साठी नामांकन
  2. World Food India 2023 : वर्ल्ड फूड इंडिया 2023 चं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; काय आहे याचं उद्दिष्ट?
  3. 106th Episode of Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींनी केली 'या' नवीन संघटनेची घोषणा, कधी होणार शुभारंभ?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.