ETV Bharat / bharat

World Food India 2023 : वर्ल्ड फूड इंडिया 2023 चं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; काय आहे याचं उद्दिष्ट?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 9:52 AM IST

Updated : Nov 3, 2023, 10:10 AM IST

World Food India 2023 : PM मोदी आज नवी दिल्लीत 'वर्ल्ड फूड इंडिया 2023' च्या दुसऱ्या हंगामाचं उद्घाटन करतील. कृषी-अन्न क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी हे आयोजन करण्यात आलंय.

World Food India 2023
World Food India 2023

नई दिल्ली World Food India 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय राजधानीतील प्रगती मैदानावर 'वर्ल्ड फूड इंडिया 2023' या मेगा फूड इव्हेंटच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन करतील. प्रगती मैदानातील भारत मंडपममध्ये सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. बचतगटांना बळकटी देण्याच्या उद्देशानं पंतप्रधान एक लाखाहून अधिक एसएचजी सदस्यांना प्रारंभिक भांडवली मदत वितरित करणार आहेत. एसएचजींना चांगले पॅकेजिंग आणि दर्जेदार उत्पादनाद्वारे बाजारपेठेत चांगले मूल्य मिळविण्यात मदत करेल, असं पंतप्रधान कार्यालयानं अधिकृत निवेदनात म्हटलंय. पीएम मोदी वर्ल्ड फूड इंडिया 2023 चा भाग म्हणून फूड स्ट्रीटचं उद्घाटनही करतील. यात प्रादेशिक खाद्यपदार्थ आणि राजेशाही खाद्यपदार्थांचा समावेश असेल.

200 हून अधिक शेफ होणार सहभागी : या मेगा इव्हेंटमध्ये 200 हून अधिक शेफ सहभागी होऊन पारंपारिक भारतीय पदार्थ तयार करतील. अशा परिस्थितीत हा एक अनोखा अनुभव असेल. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट भारताला जगातील खाद्यपदार्थाच हब म्हणून प्रदर्शित करणं आणि 2023 हे बाजरीचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करणं आहे. ही इव्हेंट सरकारी संस्था, उद्योग व्यावसायिक, शेतकरी, उद्योजक आणि इतर भागधारकांना चर्चेत सहभागी होण्यासाठी, भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी आणि कृषी-अन्न क्षेत्रात गुंतवणूकीच्या संधी शोधण्यासाठी नेटवर्किंग आणि व्यवसाय मंच प्रदान करेल.

कार्यक्रमात 48 सत्र : यात सीईओ राउंडटेबल गुंतवणूक आणि व्यवसाय करणं सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करेल. भारतीय अन्न प्रक्रिया उद्योगातील नावीन्य आणि सामर्थ्य दर्शविण्यासाठी विविध मंडप उभारलं जातील. या कार्यक्रमात अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करणारी 48 सत्रं आयोजित केली जातील. ज्यात आर्थिक सक्षमीकरण, गुणवत्ता हमी आणि यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानातील नवकल्पना यावर भर दिला जाणार आहे.

80 हून अधिक देश होणार सहभागी : या कार्यक्रमात प्रमुख अन्न प्रक्रिया कंपन्यांच्या सीईओंसह 80 हून अधिक देश सहभागी होणार आहे. रिव्हर्स बायर सेलर मीटचीही सुविधा असेल. तसेच 80 हून अधिक देशांतील 1200 हून अधिक विदेशी खरेदीदार यात सहभागी होणार आहेत. नेदरलँड्स भागीदार देश म्हणून काम करेल. त्याचबरोबर जपान हा या कार्यक्रमाचा फोकस देश असेल.

हेही वाचा :

  1. 106th Episode of Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींनी केली 'या' नवीन संघटनेची घोषणा, कधी होणार शुभारंभ?
  2. PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा, शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेणार; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम
  3. Ayodhya Ram Mandir : 'या' तारखेला होणार राम मंदिराचं उद्घाटन, पंतप्रधान मोदींनी निमंत्रण स्वीकारलं
Last Updated : Nov 3, 2023, 10:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.