ETV Bharat / bharat

PM Security Breach : पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत घोडचूक; तीन सदस्यीय समिती पोहचली घटनास्थळी

author img

By

Published : Jan 7, 2022, 12:23 PM IST

केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गृह मंत्रालयाने तीन सदस्यीय समिती ( Security Lapses In Punjab ) स्थापन केली आहे. या समितीचे पथक घटनास्थळी पोहोचले असून सविस्तर तपास सुरू करण्यात येत आहे.

PM Security Breach
पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली - पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत घोडचूक ( Security Lapses In Punjab ) झाली. हे प्रकरण तापले आहे. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गृह मंत्रालयाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे पथक घटनास्थळी पोहोचले असून सविस्तर तपास सुरू करण्यात येत आहे.

पंतप्रधानच्या सुरक्षेत चूक झाल्याने पंजाब भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अश्विन कुमार यांनी राज्यपालांची भेट घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात ( Narendra Modi Meets President Ramnath Kovind ) जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींच्या सुरक्षेंवर चिंता व्यक्त केली.

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कोणतीही आणि चूक झाली नसल्याचा दावा केला आहे. तर पंतप्रधानाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने जेष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

काय प्रकरण ?

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते. यावेळी भारतीय किसान युनियनने केलेल्या निदर्शनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा फिरोजपुर येथील उड्डाणपुलावर 20 मिनिटे अडकून पडला होता. त्यानंतर मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले. पंजाब सरकारने उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाचा अहवाल तीन दिवसात देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - PM Security Breach : पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; भाजपाची काँग्रेसविरोधात देशव्यापी मोहीम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.