ETV Bharat / bharat

PM Inaugration Vande Bharat : चेन्नई-कोईम्बतूर वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

author img

By

Published : Apr 8, 2023, 10:45 PM IST

PM Inaugration Vande Bharat
PM Inaugration Vande Bharat

पंतप्रधान मोदींनी आज तेलंगणा तसेच तामिळनाडूला प्रत्येकी एक वंदे भारत ट्रेन भेट दिली. दक्षिण भारतातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या 6 राज्यांपैकी कर्नाटकात सध्या भाजपचे सरकार आहे, तर पुद्दुचेरीमध्ये भाजप युतीसह सत्तेत आहे. यामुळेच कर्नाटक आणि तेलंगणातील निवडणुका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन दक्षिण भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यात अनेक योजनांचा सुभारंभ आज केला.

मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन

नवी दिल्ली : 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत भाजप दक्षिणेच्या मदतीने विजयाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपण 2019 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर, 6 दक्षिणेकडील राज्यांमधील 130 लोकसभा जागांपैकी भाजपकडे फक्त 29 जागा आहेत, त्यापैकी 25 कर्नाटकात, चार तेलंगणात आहेत. तर पक्षाला तामिळनाडू आणि इतर राज्यात लोकसभेची एकही जागा जिंकता आली नाही. यावेळी भाजपची नजर मिशन दक्षिणकडे असून पंतप्रधानांनी शनिवारपासून त्याची सुरुवात केली आहे. तेलंगणातील सिकंदराबाद ते तिरुपतीपर्यंत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. त्याचवेळी चेन्नई ते तामिळनाडूतील कोईम्बतूरपर्यंत धावणाऱ्या वंदे भारतलाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला. याशिवाय, या दोन दिवसांत पंतप्रधान तेलंगणा, तामिळनाडूनंतर कर्नाटकातील महामार्ग आणि अन्य प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

वंदे भारत ट्रेनला हिरवा झेडा : चेन्नई ते कोईम्बतूरपर्यंत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई येथे तेराव्य वंदे भारत ट्रेनला कोईम्बतूर येथे हिरवी झेंडी दाखवली. त्याचप्रमाणे या ट्रेनच्या लोको पायलट केबिनमधून वंदे भारतचा वेग वाचकांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या ट्रेनच्या लोको पायलटने सांगितले की ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकते, परंतु या मार्गाची क्षमता 130 किमी प्रतितास आहे, त्यामुळे ते या वेगाने धावत आहेत.

स्लीपर वंदे भारत चालवण्याचीही तयारी सुरू : दुसरीकडे, लवकरच सरकार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस 100 किमी पेक्षा जास्त अंतर असलेल्या स्थानकांसाठी देखील सुरू केली जाऊ शकते. त्यासाठी मार्ग निवडला जात आहे. मात्र, सध्या ज्या मार्गांवर वंदे भारत सुरू आहे, त्या मार्गांवरून रेल्वेला भरपूर नफा होत आहे. यामुळे रेल्वे वंदे स्लीपर भारतात आणण्याची योजनाही तयार करत आहे. सध्या वंदे भारत सुरू असलेल्या मार्गावरून प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करत आहेत. त्यात स्लीपर कोचची भर पडताच प्रवाशांची संख्या आणखी वाढेल, अशी रेल्वेला खात्री आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रथम दिल्ली-वाराणसी मार्गावर धावू शकते. ICF चेन्नई व्यतिरिक्त, महाराष्ट्र, हरियाणा, रायबरेली येथे वंदे भारत ट्रेन बनवण्याची योजना आहे. 2027 पर्यंत 478 वंदे भारत ट्रेन तयार करण्याचे लक्ष सरकारचे आहे . 200 स्लीपर वंदे भारत ट्रेन बनवण्याचे काम पूर्ण करण्याची रेल्वेची योजना आहे.

हेही वाचा - Balasaheb Thackeray Ayodhya : बाळासाहेब ठाकरे कधीच अयोध्येला गेले नाहीत; वाचा काय आहे नेमके कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.