ETV Bharat / state

Balasaheb Thackeray Ayodhya : बाळासाहेब ठाकरे कधीच अयोध्येला गेले नाहीत; वाचा काय आहे नेमके कारण

author img

By

Published : Apr 8, 2023, 7:28 PM IST

Updated : Apr 8, 2023, 7:34 PM IST

Balasaheb Thackeray Not Visit Ayodhya
Balasaheb Thackeray Not Visit Ayodhya

हिंदुत्वाचे प्रतीक ठरवल्या गेलेल्या आणि आपण कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यासाठी ठाकरे कुटुंबीयांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येचे दौरे केले आहेत. मात्र, शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदय सम्राट म्हणून ओळख असलेले बाळासाहेब ठाकरे मात्र कधीच राम लल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत गेले नाहीत. वाचा नेमके काय आहे कारण...

हिंदुत्वापासून फारकत घेतली नसल्याचे दाखवण्यासाठी शिवसेनेचा अयोध्येचा दौरा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार, खासदारांसह पुन्हा एकदा अयोध्येच्या दर्शनासाठी निघाले आहेत. यापूर्वी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदार खासदारांनी अयोध्या दौरा केला होता. भाजपशी असलेले संबंध आणि युती तोडल्यानंतर शिवसेनेला आपण हिंदुत्वापासून फारकत घेतलेली नाही हे दाखवण्यासाठी अयोध्येचे दौरे करावे लागत आहेत.

बाळासाहेब कधीच अयोध्येत गेले नाहीत : मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राम लल्लाच्या दर्शनासाठी कधीच आयोध्येत गेले नाहीत. 1992 मध्ये कार सेवकांनी बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, जर तो ढाच्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. जाहीरपणे अशी भूमिका घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदय सम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले. पण त्यासाठी त्यांना अयोध्येत प्रत्यक्ष जाण्याची गरज लागली नाही. तसेच राम लल्लाचा दर्शनासाठी दौरा करावा लागला नाही. वास्तविक एका कोर्टाच्या कामानिमित्त बाळासाहेब ठाकरे लखनऊला गेले होते. मात्र ते फारसे महाराष्ट्राबाहेर पडले नाहीत. इतकच काय परंतु दिल्लीत एका संघटनेने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी स्वतः न जाता त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. यामागे सुरक्षेचीही काही कारणे होती. मात्र, सध्या जे रामलाल्लाच्या दर्शनाचे राजकीय दौरे सुरू आहेत. त्यांचा राजकीयदृष्ट्या संबंधित नेत्यांना किती फायदा होईल, हे आगामी निवडणुकांच्या माध्यमातूनच समोर येईल असेही जोशी म्हणाले.

राम लल्ला हिंदुत्वाचे प्रतीक : अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्याला हात घालून अयोध्या आणि प्रभू श्रीराम हे हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून भाजपा, हिंदुत्ववादी संघटनांनी प्रतिमा तयार केली. त्यामुळे अयोध्येला आणि प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच प्रखर हिंदुत्वाशी नाते सांगण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना आयोध्या वारी करावी लागत असल्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा - Unseasonal Rains Affect Farmer : वर्ध्यात अवकाळी पावसाचा हाहाकार; शेतीतील पीके जमिनदोस्त

Last Updated :Apr 8, 2023, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.