ETV Bharat / bharat

Parliament Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक; अमित शाहांनी लोकसभेत मांडले नागरिक सुरक्षा विधेयक

author img

By

Published : Aug 11, 2023, 11:57 AM IST

Updated : Aug 11, 2023, 1:56 PM IST

Parliament Monsoon Session 2023
संग्रहित छायाचित्र

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार गदारोळ केल्यामुळे संसदेची दोन्ही सभागृहे 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरुन आक्रमक झालेल्या विरोधकांनी आजही लोकसभेत मोठा गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यामुळे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या खासदारांनीही आक्रमक भूमिका घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांनी दोन्ही सभागृहात गदारोळ केल्यामुळे लोकसभेपाठोपाठ राज्यसभेचे कामकाजही 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. मात्र आता लोकसभेचे कामकाज सुरु झाले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय न्याय संहिता विधेयक, भारतीय साक्ष संहिता विधेयक आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक हे तीन विधेयक लोकसभेत मांडले आहेत.

Live Update :

  • #WATCH | Union Home Minister Amit Shah speaks on Bharatiya Nyaya Sanhita Bill, 2023; The Bharatiya Sakshya Bill, 2023 and The Bharatiya Nagrik Suraksha Sanhita Bill in Lok Sabha.

    He says, "From 1860 to 2023, the country's criminal justice system functioned as per the laws made… pic.twitter.com/TIcoeaXvjG

    — ANI (@ANI) August 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • अमित शाहांनी लोकसभेत मांडले नागरिक सुरक्षा विधेयक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत भारतीय न्याय संहिता विधेयक, भारतीय साक्ष संहिता विधेयक, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक मांडले आहे. अमित शाह लोकसभेत जोरदार टोलेबाजी करत या विधेयकाबाबतची माहिती देत आहेत.
  • I.N.D.I.A. MPs to boycott Lok Sabha proceedings against the suspension of Adhir Ranjan Chowdhury from Lok Sabha and march to Dr Ambedkar's statue in Parliament.

    — ANI (@ANI) August 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • विरोधकांचा वॉकआऊट : 'इंडिया'च्या घटक पक्षातील खासदारांनी लोकसभा कामकाजावर बहिष्कार टाकत वॉकआऊट केले आहे. विरोध खासदारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी सुरू केली आहे.
  • लोकसभा पुन्हा तहकूब : लोकसभा सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा सभापतींनी लोकसभेचे कामकाज पुन्हा अर्ध्या तासासाठी तहकूब केले आहे.

'इंडिया'च्या खासदारांची मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात बैठक : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर निशाना साधला आहे. राज्यसभेतील 'इंडिया' आघाडीच्या खासदारांची विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात बैठक पार पडत आहे. या बैठकीत 'इंडिया'च्या घटक पक्षातील खासदारांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न राहणार आहे.

राहुल गांधी सकाळीच दाखल झाले सदनात : आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याचे निलंबन करण्यात आल्यामुळे सोनिया गांधी यांनी काँग्रेस खासदारांची सकाळीच बैठक बोलावली होती. या बैठकीला काँग्रेसचे लोकसभेतील खासदार सकाळीच सदनात दाखल झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील आज सकाळीच सदनात दाखल होणे पसंत केले.

विरोधी पक्षनेत्याच्या निलंबनामुळे काँग्रेस आक्रमक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांचे लोकसभा सभापतींनी निलंबन केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या खासदारांची सकाळीच सोनिया गांधी यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर काँग्रेस खासदारांनी आक्रमक पवित्रा घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा -

  1. PM Modi On Opposition : 'देश आपल्याबरोबर आहे' मणिपूरवासियांना मोदींनी दिला विश्वास, काँग्रेसचे काढले वाभाडे
  2. Parliament Monsoon Session 2023 : लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरींचे निलंबन प्रकरण, काँग्रेसने आज बोलावली खासदारांची बैठक
Last Updated :Aug 11, 2023, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.