ETV Bharat / bharat

Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर हिंसाचार प्रकरण, विरोधक सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

author img

By

Published : Jul 25, 2023, 3:01 PM IST

Parliament Monsoon Session 2023
संपादित छायाचित्र

मणिपूर हिंसाचारावरुन विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठा गदारोळ केला आहे. सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती विरोधकांनी दिली आहे.

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ सुरू आहे. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करण्याच्या मागणीसाठी मोठा गदारोळ सुरु केला आहे. आज विरोधकांनी राज्यसभेत सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्यावर चर्चा केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात याबाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी रणनीती आखत असल्याचे स्पष्ट केले.

26 पक्षांचा मणिपूर हिंसाचारावरुन गदारोळ : विरोधकांनी मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठा गदारोळ सुरु केला आहे. विरोधकांनी आज सकाळपासूनच सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती आखल्याचे दिसून आले. विरोधकांच्या 26 पक्षांनी मणिपूर प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनासाठी कायम राहण्याचा आपला इरादा विरोधकांनी व्यक्त केला आहे.

आपच्या खासदाराच्या निलंबनावरुन विरोधक आक्रमक : आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांना राज्यसभा सभापतींनी निलंबित केले आहे. त्यामुळे विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठा गदारोळ सुरू केला आहे. आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी संजय सिंह यांच्या निलंबनावरुन सरकारवर मोठी टीका केली आहे. सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यावर विरोधक चर्चा करत असल्याचीही त्यांनी आज सकाळी माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी अहंकार बाजूला ठेवून मणिपूरवर बोलावे : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधकांच्या बैठकीनंतर ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहंकार बाजूला ठेवून मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर देशाला संबोधित करण्याचे आवाहन त्यांनी केले. मणिपूरमधील हिंसाचार 83 दिवसांपासून सुरू आहे. संपूर्ण ईशान्येकडील प्रदेशावर मणिपूरचे हिंसाचाराचे परिणाम होऊ शकतात, असेही मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये स्थिती पूर्ववत करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा -

  1. Monsoon Session 2023 : पालघर साधू हत्याकांडावर उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकले नाही, अनुराग ठाकूर यांचा विरोधकांवर हल्लाबोल
  2. Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर हिंसाचारावरुन पुन्हा गदारोळ; लोकसभेत पुन्हा विरोधकांची घोषणाबाजी सुरु
  3. BJP Parliamentary Meeting : विरोधकांना रोखण्यासाठी भाजपची रणनीती; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपच्या संसदीय समितीची बैठक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.