ETV Bharat / bharat

चीन-भारत सीमावादावर चर्चा, मानसिक आरोग्य दिनासह विविध टॉप न्यूज वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Oct 10, 2021, 6:16 AM IST

Top News on 10th October
Top News on 10th October

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

आज या घडामोडींवर असणार नजर

  • राज्यातल्या अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच काही ठिकाणी निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांना MHT-CET Exam 2021 देता आली नाही. विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा देता आलेल्या नाहीत. अशा विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ९ ऑक्टोबरपाठोपाठ १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहेत.
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीने राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश चाचणी अर्थात नीट यूजी परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थी neet.nta.nic.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनेही (एनटीए) या संदर्भात माहिती जारी केली आहे. नीटची दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी 10 ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे.
  • पूर्व लडाखला लागून असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेवरील तणावाची स्थिती संपविण्यासाठी 10 ऑक्टोबरला भारत आणि चीनच्या लष्करी कमांडर्स यांच्यात 13 व्या फेरीची बैठक होणार आहे. ही बैठक पीएलए सैन्याच्या मोल्दो चौकीत होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाखच्या वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. हॉट स्प्रिंग, डेमचोक आणि डेपसांग मैदानावर दोन्ही देशांमधील तणावाची स्थिती कायम आहे.
  • लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय राज्य गृहमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष मिश्राला शनिवारी अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयानेदेखील उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आशिष मिश्रा हा पोलिसांसमोर हजर झाला होता.
  • जगभर मानसिक आरोग्य दिन म्हणून 10 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे या दिनाचे प्रयोजन असते. भारतात मनोरुग्णालय हे फक्त अधिकृतरित्या 37 आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 3 मनोरुग्णालयांचा समावेश आहे. मनोरुग्णांची संख्या पाहता ही रुग्णालये खूपच कमी आहेत.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) मार्फत 10 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये विविध केंद्रांवर (Aurangabad center) परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी औरंगाबाद शहरात 47 उपकेंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
  • एसबीआयच्या ग्राहकांना डिजीटल सेवांमध्ये अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. एसबीआयने ट्विटरवर म्हटले की, सिस्टम मेंटेनन्ससाठी बँकेच्या काही सेवा 09, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहेत. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवांचा समावेश आहे.
  • कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शिर्डीतील विमानतळ 10 ऑक्टोंबर सुरू होणार आहे. गुरुवारी शिर्डी मंदिरे खुले झाल्याने भाविकांची सोय होणार आहे. मंदिरे सुरु झाल्यानंतर विमानसेवेची भाविकांकडून मागणी होत आहे. विमानतळ विकास प्राधिकरणाने विमानतळ नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत होऊ देण्यास परवानगी का दिली जात नाही?’, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला केली होती. तसेच या प्रश्नावर पाच दिवसांत (१० ऑक्टोबर) आणि पुढील स्थायी समितीच्या बैठकीच्या आधी योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची बैैठक कशी होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
  • तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवात ५ दिवस विशेष अलंकार पूजा केल्या जातात. १० ऑक्टोंबर रोजी मुरली अलंकार महापूजा करण्यात येत आहे.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या-

  • आशिष मिश्राची पोलिसांनी सुमारे १२ तास चौकशी केली. मात्र, तपासात सहकार्य केले जात नसल्याने आणि काही प्रश्नांची उत्तरे न दिल्याने अटक करण्यात आल्याचे सहारनपूरचे डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाची डीआयजी उपेंद्र अग्रवाल हे चौकशी करत आहेत. त्यांच्या माहितीनुसार दिवसभर चौकशी केल्यानंतर आशिष मिश्राला रात्री १० वाजून ४० मिनिटाला अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा-ASHISH MISHRA ARREST युपी पोलिसांकडून केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक

  • अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 48 लाख हेक्टरपैकी 32 ते 36 लाख हेक्टरहून अधिक नुकसान झाल्याच्या प्राथमिक आकडा आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 4 हजार कोटींची नुकसान प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली आहे. राज्याने पीक कर्जाचा हजार कोटींचा हप्ता दिल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सविस्तर वाचा- अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात अंदाजे 4 हजार कोटींचे नुकसान- अजित पवार

  • मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना नोटीस बजावली आहे. खंडणी प्रकरणी परमबीर सिंह यांना 12 ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे नोटीसमध्ये उल्लेख आहे. हरियाणाच्या निवासस्थान सोबतच मुंबईतील नीलिमा येथील परमबीर सिंह यांच्या निवासस्थानी नोटीस देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंह, सचिन वाझे आणि इतरांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा- परमबीर सिंह यांना 12 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत गुन्हे शाखेने बजावली नोटीस

  • अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) ड्रग्स पार्टी प्रकरणात मोठ्या जलदगतीने चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. आता एनसीबीने शाहरुख खानचा ड्रायव्हरला चौकशीसाठी समन्स बजावले होते. शाहरुख खानचा ड्रायव्हर आर मिश्रा एनसीबी कार्यलयात उपस्थित असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

सविस्तर वाचा-शाहरुख खानच्या वाहन चालकाला 'एनसीबी'चे समन्स, चालक चौकशीसाठी कार्यालयात हजर

  • काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी राहुल गांधी यांनी अद्याप होकार दर्शवला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांची अध्यक्ष होण्याची इच्छा नसेल तर त्याऐवजी प्रियंका गांधी यांनी ते पद स्वीकारावे, अशी मागणी काँग्रेसचे महासचिव तथा माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. ते नागपुरात वनराई फाउंडेशनच्या वतीने आयोजित इंदिरा गांधी यांचे वनसंरक्षणावर योगदान या कार्यशाळेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सविस्तर वाचा-राहुल गांधींची इच्छा नसेल तर काँग्रेसचे अध्यक्षपद प्रियंका गांधींनी स्वीकारावे, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याची इच्छा

जाणून घ्या, आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.