मेष - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज आपणास एक वेगळाच अनुभव येईल. एखादी गूढ विद्या व त्यांसंबंधीत गोष्टींचे आकर्षण वाटेल. आज एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकाल. वाणी व द्वेष भावना ह्यांवर आवर घालावा लागेल. शक्यतो नवीन कार्यारंभ करू नये. प्रवासात त्रास संभवतो.
वृषभ - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे आपणास जाणवेल. कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. त्याच बरोबर छोटया प्रवासाचे बेत आखाल. परदेशात राहण्यार्या संबंधिताकडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला आनंद होईल. अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश व कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. पण केलेला खर्च वाया जाणार नाही. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभावात रागाचे प्रमाण मात्र वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कर्क - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिक चिंता व उद्वेग राहील. अचानक खर्च वाढतील. वाद संभवतात. शक्यतो प्रवास व नवीन कार्याचा आरंभ टाळावा.
सिंह - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य नादुरुस्त असेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आपल्या वक्तव्याने गैरसमज वाढतील व आपले मन उदास होईल. आईशी मतभेद होतील व तीच्या प्रकृतीची काळजी वाटत राहील. सरकारी व मालमत्तेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी.
कन्या - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज प्रत्येक कामात विचारपूर्वक पाऊल टाकावे लागेल. भावंडांशी सौहार्दाचे संबंध टिकून राहतील. मित्र व स्वकीयांशी सुसंवाद साधू शकाल. प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ सुद्धा होतील. समाजात मान - सन्मान प्राप्त होईल.
तूळ - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे आपणास जमणार नाही. महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल आहे. कामात आपल्या आळशीपणामुळे आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे. व्यवहारात हटवादीपणा सोडल्यास परिणाम सकारात्मक मिळतील. कुटुंबीयांशी वादविवाद टाळा. प्रकृतीकडे लक्ष द्या. आर्थिक लाभ होतील.
वृश्चिक - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा - समाधानाचे वातावरण राहील. मित्र व स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल. एखाद्या प्रेक्षणीय स्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे.
धनू - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध व आवेश राहिल्याने कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. आरोग्य बिघडेल. बोलणे व वागणे यांवर संयम ठेवावा लागेल. एखादी दुर्घटना संभवते. पैसा जास्त प्रमाणात खर्च होईल. न्यायालयाशी संबंधित कामकाजात जपून पावले उचलावीत.
मकर - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. मित्र व स्नेहीजनांचा सहवास घडल्याने आजचा दिवस आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे. विवाहेच्छुकांना जोडीदाराची निवड सहजपणे करता येईल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. घरात एखादे मांगलिक कार्य होईल.
कुंभ - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज प्रत्येक कामात सहजपणे यश मिळू शकेल. मनःस्थिती आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. धनप्राप्ती होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल.
मीन - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज आपण मानसिक अस्वास्थ्यामुळे त्रस्त व्हाल. शरीरास थकवा व आळस जाणवेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. संततीची काळजी राहील. शक्यतो महत्वाचे निर्णय आज घेऊ नये. व्यापारात अडचणी येतील. मनात नकारात्मक विचार येतील.