ETV Bharat / bharat

प्रेरणादायी! प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या शकुंतला तरुणांच्या प्रेरणास्रोत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2023, 1:02 PM IST

No school to Founders lab
No school to Founders lab

No School to Founders Lab : तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील फाऊंडर्स लॅबच्या प्रमुख शकुंतला कासारगडा यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केलं. आज मेहनतीमुळं आणि समर्पणामुळं त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. आता त्या तरुणांना प्रोत्साहन देत आहेत.

हैदराबाद No School to Founders Lab : चांगले पैसे कमावता येतील म्हणून तरुण परदेशात जात आहेत, असं झालं तर देशाचं भवितव्य आणि अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल, असा कासारगडा शकुंतलाचा विचार होता. स्टार्ट-अप्सच्या दिशेनं विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन देणं, तरुण उद्योजक घडवणाऱ्या ज्यांनी अभ्यासासाठी खूप संघर्ष केला त्या शकुंतला कासारगडा यांनी 'एकेकाळी शाळेत न जाता फाउंडर्स लॅबची स्थापना कशी केली, यावर 'ईटीव्ही भारत'शी त्यांनी सविस्तर बातचित केली.

वडिलांच्या निधनानंतर शाळेत प्रवेश : शकुंतला कासारगडा म्हणाल्या, 'मुलीनं काबाडकष्ट करु नये, अशी घरात भावना असते. त्यामुळं मी घरी माझ्या मोठ्या भावाच्या पुस्तकांतून अभ्यास केला. मी 12 वर्षांची असताना माझे वडील सत्यनारायण यांचं निधन झालं. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी मला शाळेत पाठवण्यास होकार दिला. मी दहावीपर्यंत सरकारी शाळेत शिकले. यानंतर पुढील शिक्षणाची गरज का आहे, असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केला. उपस्थितीबाबत सूट मिळाल्यानंतर मी इंटरमिजिएट आणि बीए समाजशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला. नंतर माझा हट्ट बघून घरातील सदस्यांनी मला पाठिंबा दिल्यावर मी उस्मानिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.

मौलाअली इथं सामुदायिक शाळा : शकुंतला पुढे म्हणाल्या, 'मी ही सनदी अधिकाऱ्यांसाठीच्या परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेले होते. पण आमच्या सोबत असलेले आजोबा वारले आणि मला नोकरी करावी लागली. त्यानंतर मला टाटा ट्रस्टकडून 2 लाख रुपयांची फेलोशिपही मिळाली. मात्र ज्यांना ती मिळते त्यांना तीन वर्षे ग्रामविकास कार्यक्रमात काम करावं लागतं. त्यामुळं मदुराई येथील 'डॉन फाऊंडेशन' मध्ये सहभागी झाले. क्षेत्रीय स्तरावरच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणण्याचं काम करत होते. त्यानंतर मी हैदराबादला आले. कारण तिची सेवा तेलुगू राज्यांमध्येही उपलब्ध होती. माझ्या नेतृत्वाखाली मौलाअली इथं सामुदायिक शाळा उघडली आणि त्याला सरकारी मान्यता मिळाली हे मी विसरू शकत नाही.

फाऊंडर्स लॅबची सुरुवात : त्या पुढे म्हणाल्या, त्यानंतर मी BYST अर्न्स्ट अँड यंग इथं युवा उद्योजकता आणि आंध्र प्रदेश सरकारसोबत डिजिटल गव्हर्नन्सवर काम केलं. 18 वर्षात सुमारे 20 हजार महिलांना मदत केली. वी हब मधील सोशल इम्पॅक्ट उद्योजक प्रमुख म्हणून, मी स्टार्टअप्सना निधी आणि विपणनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि एक मार्गदर्शक म्हणूनही काम केलं. विद्यार्थ्यांना संधीच्या शोधात परदेशात जाताना पाहिल्यावर देशाच्या भविष्याचं आणि अर्थव्यवस्थेचं काय होणार, असा प्रश्न मला पडतो. त्यांना व्यवसायाकडं प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी आम्ही 'फाऊंडर्स लॅब' सुरू केली. तेलंगणाचे मंत्री केटीआर यांनी त्याचं उद्घाटन केलं. माझी चार लाख रुपयांची नोकरी सोडून मी धोका पत्करतेय याची मला पर्वा नव्हती.

आम्ही 24 तास उपलब्ध : पुढं त्या म्हणाल्या, आमच्या लॅबमध्ये विविध प्रांत आणि भाषांमधील 12 जणांचा समावेश आहे. आम्ही विद्यार्थ्यांसाठी 24 तास उपलब्ध आहोत. थोड्या पाठिंब्यानं स्टार्टअप्स नियमित कॉलेजांमधूनही येऊ शकतात, हे सिद्ध करणं माझं ध्येय आहे. मी स्पर्धा परीक्षे देऊ शकले नाही. मात्र परिस्थितीनुसार मी स्वतःला बदललं. त्या म्हणतात, आर्थिक स्वातंत्र्य मिळवा. तुमचं भविष्य ठरवा. तेच खरं स्वातंत्र्य. कोणीही काही देत ​​नाही. ते तुम्हालाच कमवावं लागेल. आजच्या पिढीला हा शकुंतला यांना हा संदेश दिला आहे.

हेही वाचा :

  1. Historical School In Mumbai : मुंबापुरीत 132 वर्षापासून सुरू आहे ऐतिहासिक शाळा; अभिनेता स्वप्निल जोशीनंही घेतलं शिक्षण, जाणून घ्या शाळेचा इतिहास
  2. Online Attendance : शिक्षण विभागाच्या डोळ्यात अंजन! 27 हजार शाळांमध्ये वीज नाही, ऑनलाइन हजेरी नोंदवायची तरी कशी?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.