अलकायदाच्या दहशतवाद्यांचे लखनौसह कानपूरमध्ये कनेक्शन... एनआयएकडून तपास सुरू

author img

By

Published : Aug 19, 2021, 3:31 PM IST

एनआयए
एनआयए ()

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये अलकायदाचा कमांडर उमर-हल-मंडीने उत्तर प्रदेशमध्ये स्वांत्र्यदिनाला बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसांतच एनआयएने प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.

लखनौ - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अलकायदाच्या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. एनआयने उत्तरप्रदेशमधील लखनौ, कानपूरमधील कोकोरी येथून पकडण्यात आलेल्या संशयित दहशतवादी मिनहाज, मुशीर आणि त्यांच्या पाच साथीदारांचे कनेक्शन शोधत आहे.

एनआयएच्या दिल्ली आणि लखनौच्या संयुक्त टीमने लखनौ, कानपूरसहित पश्चिम उत्तर प्रदेशमधील सहारनपूर आणि बिजनौर येथून 12 लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची एनआयएककडून चौकशी करण्यात येणार आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व संशयित दहशतवाद्यांचा संबंध हा अलकायदाच्या अन्सार गजवातुल हिंद मॉड्यूलशी आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कानपूरमध्ये शस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी मदत करणाऱ्या आफाकविषयीही चौकशी केली होती.

हेही वाचा-तालिबानने भारतासोबतची आयात आणि निर्यात रोखली; सुक्या मेव्याचे भाव वाढण्याची शक्यता

एनआयए टीम पुन्हा कानपूरला करणार चौकशी

संशयित दहशतवादी मिनहाज आणि मसीरुद्दीन उर्फ मुशीरचा साथीदार शकील, मुस्तकीन आणि मुईद यांना एनआयएने अटक केली होती. अटकेनंतर आफाककडून शस्त्र पुरविण्यासाठी मदत करण्यात आल्याचे समोर आले होते. एनआयएच्या टीमने आफाकबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आरोपींबरोबर आफाक ज्या घराबाहेर बैठक घेणार होता, त्या घराचीही एनआयए टीमने बाहेरून पाहणी केली आहे. सुत्राच्या माहितीनुसार या प्रकरणात टीम पुन्हा कानपूरला जाऊ शकते. आफाकच्या ठावठिकाणाविषयी एनआयए टीमला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. एनआयएला अलकायदाच्या तीन महिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार टीम बुधवारी पुन्हा गंगागंज येथे गेली होती. एनआयए टीमने चमनगंज, बेकनगंज आणि जाजमऊ येथे चौकशी केली आहे.

हेही वाचा-...म्हणून माध्यमांना संबोधित करताना काँग्रेसच्या महिला खासदाराला रडू कोसळलं

अलकायदाच्या कमांडरने रचला कट

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये अलकायदाचा कमांडर उमर-हल-मंडीने उत्तर प्रदेशमध्ये स्वांत्र्यदिनाला बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसांतच एनआयएने प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. एनआयए लखनौच्या एसपी ज्योती प्रिया सिंह यांची मुख्य तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एनआयएकचे डीआयजी प्रशांत कुमार आणि एसपी ज्योती प्रिया सिंह यांच्यासहित विविध अधिकारी प्रकरणांचा सातत्याने तपास करत आहेत. तसेच टीमला मार्गदर्शन करत आहेत. एनआय लवकरच तुरुंगातील कैद्यांची चौकशी करणार आहे.

हेही वाचा-Sher Mohammad Abbas Stanekzai: तालिबानच्या प्रमुख नेत्याचे उत्तराखंडच्या भारतीय लष्करी अकादमीशी जुने संबंध

एटीएसने काकोरी येथून ताब्यात घेतली होती स्फोटके

उत्तर प्रदेश एटीएसने काकोरीच्या दुबग्गा पोलीस स्टेशन परिसरातून 11 जुलै 2021 रोजी 2 दहशतवाद्यांना अटक केली. या दोन्ही दहशतवाद्यांचा अल कायदाशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. एटीएसने दुपारी 12.30 वाजता या भागात शोध मोहीम सुरू केली होती. काकोरीच्या रिंग रोडवरील घरातून दहशतवाद्यांना पकडण्यात आले. या दोन्ही दहशतवाद्यांचा अल कायदाशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. छापेमारी दरम्यान एटीएसने खबरदारी म्हणून घटनास्थळाजवळील घरे रिकामी केली होती. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस दल उपस्थित होते. एटीएसने घटनास्थळावरुन दोन प्रेशर कुकर बॉम्ब, अर्धनिर्मित टाईम बॉम्ब आणि 6-7 किलो स्फोटके जप्त केल्याचा दावा केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.